NMMS SCHOLARSHIP चा अर्ज MOBILE/PC/LAPTOP वरून कसा करावा?
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022.
सर्वप्रथम खालील अर्जावर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरून घ्यावी म्हणजे अर्ज करतांना माहिती इकडे तिकडे पाण्याची गरज पडणार नाही ती एकाच ठिकाणी मिळेल.
खालील नमुन्यावर फोटो चिटकवून त्याखाली स्वाक्षरी करून घ्यावी म्हणजे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी ती उपयोगी ठरेल.
तसेच विद्यार्थी सरल आयडी देखील नोंदवावा.
वरील कोरा पीडीएफ स्वरूपातील अर्ज आपण खालील Download वर क्लिक करून डाऊनलोड करून घ्यावा. Download
वरील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट काढून घेतल्यानंतर पूर्णपणे भरून घ्या व त्यानंतर पुढील प्रमाणे टप्प्याटप्प्याने संपूर्ण अर्ज भरा.
शाळा नोंदणी (registration)
खालील प्रमाणे गुगल सर्च करा.
पहिल्या आलेल्या पर्यायावर click करा.
त्यानंतर पुढीलप्रमाणे विंडो open होईल. त्या मधील NMMS वर click करा.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022 साठी शाळा नोंदणी करण्यासाठी खालील दिलेल्या विंडो मधील चौकटीतील अक्षरांवर क्लिक करावे.
वरील विंडो मधील शाळा नोंदणी वर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल सदर विंडोमध्ये आपल्या शाळेचा यु डायस नंबर नोंदवावा यु डायस नंबर नोंदवल्यानंतर आपल्या शाळेचे नाव येईल ते आपल्याच शाळेचे असल्याची खात्री करावी व सिलेक्ट बटन वर क्लिक करून एस ऑप्शन निवडावे.
त्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल सदर विंडो मधील सर्व माहिती पशु कृत्या नोंदवावी शेवटी दिलेल्या सब्मिट अँड पे Submit & Pay बटन वर क्लिक करावे त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये ऑनलाइन आपणास शक्य असलेल्या माध्यमातून शाळा संलग्नता फी दोनशे रुपये भरल्यानंतरच समोरील ऑप्शन ओपन होतात ते भरून घ्यावे
वरील विंडोमध्ये आपला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी नोंदवावा आपल्या मोबाईल नंबर व ई-मेल आयडी वर आता तुम्हाला युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झालेला असेल तो यूजर आयडी वापरून लॉग इन करावे. लोगिन झाल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार शाळा प्रोफाइल पूर्ण भरून घ्यावी.
शाळा प्रोफाईल मध्ये पुढील प्रमाणे माहिती पूर्णपणे भरावी लागेल त्यामध्ये मुख्याध्यापकाचा फोटो व त्याखाली मुख्याध्यापकाची सही असलेला फोटो योग्य त्या आकारात अपलोड करावा लागतो सर्व माहिती व फोटो अपलोड केल्यानंतर शेवटी दिलेल्या Save & Preview बटन वर क्लिक करावे.
वरील विंडो मधील सेव अँड प्रिव्ह्यू बटन वर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे विंडो ओपन होईल.
वरील विंडोमध्ये आलेली सर्व माहिती काळजीपुर्वक तपासावी जर माहितीत तफावत असेल तर एडीत बटन वर क्लिक करून माहिती दुरुस्त करून घ्यावी व माहिती अचूक असेल तर शेवटी दिलेल्या Submit बटन वर क्लिक करावे आपल्या शाळेची प्रोफाइल पूर्ण अपडेट होईल.
त्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये डाव्या बाजूला डॅशबोर्ड खाली स्टुडंट रजिस्ट्रेशन असे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करावे.
स्टुडंट्स रजिस्टेशन वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये शाळेचा यु डायस आपोआप आलेला असेल त्या खालील रकान्यात ज्या विद्यार्थ्यांचा अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्याचा सरल स्टुडन्ट आयडी नोंदवावा व खाली दिलेल्या Verify बटन वर क्लिक करावे.
विद्यार्थ्यांच्या नावासहित खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधील सुरूवातीची पाच प्रश्नांची उत्तरे नोंदवल्यानंतर संपूर्ण माहिती भरण्याची टॅब ओपन होईल.
संपूर्ण माहिती योग्य आणि अचूक पणे सिलेक्ट अथवा नोंदवून अर्ज पूर्ण भरावा विद्यार्थी फोटो व त्याखाली सही करून त्याचा फोटो योग्य त्या आकारात अपलोड करावा.
संपूर्ण माहिती व फोटो अपलोड झाल्यानंतर Submit & Preview बटन वर क्लिक करावे आपला अर्ज पूर्ण भरून नोंदवला जाईल.
वरील प्रमाणे शाळेतील जेवढ्या विद्यार्थ्यांना सदरची परीक्षेत बसायचे आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांचा अर्ज ऑनलाईन करावा त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित परीक्षा शुल्क परीक्षा परिषदेस योग्य त्या माध्यमातून भरावी आपला अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. परीक्षा दिनांक च्या पूर्वी परीक्षा परिषदेकडून विद्यार्थी प्रवेश पत्र उपलब्ध होतील.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
0 Comments