नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, यांचे साठी महत्वाचे अपडेट.
मुख्याध्यापकांना प्रमाणिक करावी लागणार विद्यार्थी प्रवेश पत्रा वरील माहिती. म्हणजेच प्रवेश पत्रावर मुख्याध्यापकाचा सही व शिक्का अनिवार्य असणार आहे.
विद्यार्थी मुळ प्रवेश पत्र परिक्षेच्या वेळी पर्यावेक्षक जमा करून घेणार.
जर पालक विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र आपल्याकडे ठेवायचे असेल तर अगोदरच त्याची फोटो प्रत म्हणजेच झेरॉक्स कॉपी काढून ठेवावी लागणार.
Covid-19 संदर्भातील सर्व नियम सक्तीने पाळावे लागणार.
विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश पत्र व काळा किंवा निळा बॉलपेन व्यतिरिक्त कुठलेही साहित्य नेता येणार नाही.
यावर्षीचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग सहावा चे प्रवेश पत्र नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत प्रवेश पत्रा वरील सूचनांनुसार यावर्षी काही बदल करण्यात आले आहेत.
त्यापैकी महत्त्वाचा बदल म्हणजे दरवर्षी विद्यार्थी प्रवेश पत्र डाऊनलोड करून प्रिंटआऊट काढून जसेच्यातसे प्रवेश पत्र प्रवेश परीक्षा कक्षात घेऊन जायचे त्यावर मुख्याध्यापकाचा शिक्का व स्वाक्षरी आवश्यक नसायची ती नवोदय विद्यालय यांनी आता अनिवार्य केली आहे.
मागील वर्षी पर्यंत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची प्रवेश पत्र पर्यावेक्षक आकडे जमा करण्याची गरज नव्हती परंतु या वर्षी परीक्षा संपल्यानंतर सदर प्रवेश पत्र पर्यावेक्षक लाकडे जमा करून द्यायचे आहे त्यामुळे पालकांना प्रवेश पत्र आपल्या जवळ ठेवायचे असेल तर परीक्षा केंद्रावर जाण्यापुर्वी सदर प्रवेश पत्राची फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी आपल्याकडे करून ठेवायची आहे.
राज्यशासनाने जरी covid-19 संदर्भातील सर्व नियम शिथिल केले असले तरी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग सहावी साठी परीक्षा केंद्रावर जाताना covid-19 संदर्भातील सर्व नियम सक्तीने पाळायचे आहे अशा सूचना प्रवेश पत्रावर देण्यात आल्या आहेत.
तसेच परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र व निळा किंवा काळा बॉल पेन या शिवाय कोणतेही साहित्य जवळ बाळगणे प्रतिबंधित असणार आहे म्हणजेच कोणतेही इतर साहित्य विद्यार्थ्यांनी जवळ बाळगायचे नाही अशा सूचना देखील प्रवेश पत्र वर देण्यात आले आहे.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
0 Comments