शाळांना करावे लागणार शालेय पोषण आहाराचे सामाजिक अंकेक्षण (Social Audit) - शिक्षण संचालक (प्रा).
महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक मा. दिनकर टेमकर यांनी शालेय पोषण आहार योजनेची सामाजिक अंकेक्षण सोशल ऑडिट व मूल्यांकन करणेबाबत दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी एक परिपत्रक निर्गमित केले आहे.
या परिपत्रकानुसार शालेय पोषण आहार योजनेचे सामाजिक अंकेक्षण मूल्यांकन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाद्वारे घेतलेला आहे. शालेय पोषण आहार योजनेत पात्र असलेल्या राज्यातील शाळांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील किमान पाच टक्के शाळांचे व सर्व जिल्हा परिषद कार्यालयातील त्याचे सामाजिक अंकेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णयामध्ये निर्देशीत केल्यानुसार महाराष्ट्राचे सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी या संस्थेतून नियुक्त करण्यात आलेल्या यंत्रणेकडून शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेल्या राज्यातील शाळांचे व सर्व जिल्हा परिषद कार्यालयाचे सामाजिक अंकेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे सामाजिक अंकित शिक्षणाबाबत आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना देण्यात आले आहेत तथापि महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण गोपाल पारदर्शकता सोसायटी मुंबई यांचे कार्यालयात कडून नियुक्त संस्थेच्या प्रतिनिधी करून शाळा स्तरावरील मुख्याध्यापक शिक्षक यांचेकडून तपासणीच्या नावाखाली पैशाची मागणी करत असल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे सदर बातमीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे.
शालेय पोषण आहार योजनेत पात्र असलेल्या शाळांचे व सर्व जिल्हा परिषद कार्यालयांचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी या संस्थेत संचालनालयाकडून निधी मंजूर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आहे त्यामुळे सदर संस्थेचे किंवा त्यांच्या प्रतिनिधी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यास स्पष्टपणे नकार द्यावा तसेच प्रचलित नियमानुसार सदर संस्थेच्या विरुद्ध पोलीस तक्रार नोंदवण्यात यावी.
महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मुंबई यांचे कार्यालयाकडून नियुक्त संस्थेच्या प्रतिनिधी कोणत्याही स्वरूपात पैसे देण्यात येऊ नये याबाबत आपले अधीनिस्त क्षेत्रीय यंत्रणेस निर्देश देण्यात यावे.
आपल्या जिल्ह्यात सदर प्रकारच्या घटना घडू नये याची दक्षता घेण्यात यावी.
वरील पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments