माहे एप्रिल 2022 चे वेतन एप्रिल 2022 मध्येच मंजूर करणे बाबत - संचालक, लेखा व कोषागारे यांचे पत्र.
रमजान ईद दिनांक ३/५/२०२२ ला असल्याने व १ मे व ३ मे ची सुट्टी आल्यामुळे माहे एप्रिल 2022 चे देय वेतन सर्व कोश आगार कार्यालय यांनी एप्रिल 2022 अखेर मंजूर करावी म्हणजे सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन ईद पूर्वी करणे शक्य होईल अशी विनंती माननीय श्रीकांत देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांनी संचालक, लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य यांना पत्र लिहून दिली होती त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या लेखा व कोषागारे संचालनालय याने सर्व जिल्हा कोषागार अधिकारी व सर्व उपकोषागार अधिकारी यांना एक परिपत्रक निर्गमित करुन
अधिदान व लेखा कार्यालय मुंबई, जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालयामध्ये प्राप्त झालेली व होणारी वेतन देयके तपासणी करून ईद पूर्वी सदर वेतन प्रधान होतील याबाबत अधिदान व लेखा अधिकारी मुंबई व सर्व जिल्हा कोषागार अधिकारी यांनी नियोजन करावे व दक्षता घ्यावी अशा सूचना संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य यांनी दिल्या आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्यातील शासकीय निम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा उच्च माध्यमिक शाळा यामध्ये काम करणारे सर्व अनुदानित कर्मचारी यांची माहित एप्रिल 2022 चे वितरण सिद पूर्वी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments