थेट लाभ हस्तांतरण(DBT) प्रक्रियेमधून समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजना वगळली.
शाळा व्यवस्थापन समितीस खरेदीचे अधिकार.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार.
राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा यांचे पत्र.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागा च्या समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा यांच्या सहीनिशी आयुक्त महानगरपालिका सर्व व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना उद्देशून निर्गमित केलेल्या पत्रानुसार समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सन 2022 23 या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शालेय गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या ते परिपत्रक पुढील प्रमाणे.
शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश पुणे चा पेठ लाभ हस्तांतरण प्रक्रियेमधून कायमस्वरूपी वगळण्यात आले आहे याकरिता सदर शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी जिल्हा मनपा निहाय भौतिक लक्ष जोडण्यात आलेले आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश खरेदी प्रक्रिये बाबत महत्त्वाच्या सूचना.
समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा मंजूर निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित कळा व्यवस्थापन संबंध समित्या कडे भौतिक लक्षा प्रमाणे पंधरा दिवसात वर्ग करण्यात यावा.
इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश ची तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या निकष पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन संच गणवेशाचे वाटप वाटप करण्यात यावे.
शाळा व्यवस्थापन समित्यांना अनुदान वितरणास विलंब होऊ नये म्हणून सदरचे अनुदान जिल्हा स्तरावरून थेट शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर वितरित करावे.
राज्य शासनाचे सामाजिक न्याय विभाग आदिवासी विभाग अल्पसंख्यांक विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी गणवेश अथवा शासनमान्य वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना गणवेश याचा लाभ दिला जात असल्यास अशा लाभार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येऊ नये एकाच विद्यार्थ्यास दुबार गणवेशाचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
ज्या महानगरपालिका आन कडून त्यांच्या स्व निधीमधून महानगरपालिका अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येतो अशा लाभार्थी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेषाचा दुबार लाभ देण्यात येऊ नये.
शालेय गणवेषाचा रंग प्रकार स्पेसिफिकेशन इत्यादी बाबी संदर्भात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा याबाबत राज्य जिल्हा तालुका स्तरावर निर्णय घेण्यात येऊ नये.
गणवेश व पुरवठा बाबत संपूर्ण अधिकार संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती असल्याने शाळा व्यवस्थापन समिती ऐवजी कोणत्याही वरिष्ठ पातळीवर केंद्र तालुका जिल्हा स्तरावरून गणवेश पुरवठा बाबतची कोणतेही निर्णय घेण्यात येऊ नये.
प्रत्येक शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून त्यांच्या शाळेतील गणवेश पात्र लाभार्थ्यांच्या वयोगटानुसार व लाभार्थ्यांच्या मापानुसार मुलांसाठी आणि मुलींसाठी गणवेश खरेदी करून वितरित करावे.
गणवेश शिलाई पक्क्या जागेची असावी शिलाई निघाल्यास गणवेशाचे कापड फाटल्यास अथवा गणवेश या बाबत कोणतीही तक्रार उपस्थित झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहील.
मंजूर तरतुदीपेक्षा अधिकचा खर्च होणार नाही याची दक्षता देखील संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने घेणे आवश्यक आहे मंजूर समित तर तुझी पेक्षा जास्त खर्च झाल्यास ज्यादा झालेला खर्च मान्य केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात व गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करावे.
गणवेश खरेदी देयकांची अलागाई संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने धनादेशाद्वारे करावी गणवेश पुरवठादारास रोखीने अलग करू नये राधाबाई केल्या बाबतचे अभिलेखे धन्य आदेशाची झेरॉक्स प्रत संपूर्ण हिशोबाच्या अचूक नोंदी तसेच दस्तऐवज जतन करून ठेवावे लेखापरीक्षण वेळेस लेखापरीक्षक का संपूर्ण दिनांकासह हिशेबाची माहिती अभिलेखे उपलब्ध करून देता येईल या प्रमाणे लेखा वषयक बाबींच्या नोंदी ठेवण्यात यावे.
शाळास्तरावर स्टॉक रजिस्टर ठेवण्यात यावे सदर रजिस्टर मध्ये गणवेश वितरणाचा दिनांक गणवेश मिळाल्या बाबत संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांचे व त्याच्या पालकाची स्वाक्षरी पंख्याचा कसा घेणे आवश्यक आहे.
गणवेश वितरण या बाबतची कार्यवाही झाल्यानंतर मंजूर तुती मधील रक्कम शिल्लक असल्यास सदर अखर्चित रक्कम त्याच व्यक्ती या आर्थिक वर्षात राज्य स्तरावर जमा करावी व त्याबाबत नोंद ठेवण्यात यावी.
शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सर्व गटांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार त्यांच्या जिल्ह्यात संकलित अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयास व शिक्षण संचालक प्राथमिक सेमी शिक्षण संचालनालय पुणे या कार्यालयास सादर करावे.
गणवेश वितरण यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही तसेच गणवेश पात्र लाभार्थी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण विस्ताराधिकारी गटशिक्षण अधिकारी महानगरपालिका प्रशासन अधिकारी व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी घेणे आवश्यक आहे.
सन 2022 23 मध्ये भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ पुणे 2020 21 च्या यु-डायस मधील उपलब्ध माहितीनुसार भौतिक लक्ष व आर्थिक तरतूद इस मंजुरी दिली आहे त्या अनुषंगाने जिल्हा मनपा निहाय तक्ता सोबत जोडला आहे.
गणवेश पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप होणे आवश्यक आहे या अनुषंगाने नियोजन करुन गणवेश योजनेसाठी मंजूर असलेल्या तरतुदींचा विनियोग करण्यात यावा.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments