महाराष्ट्रात कोरोना पार्श्वभूमीवर असलेले सर्व निर्बंध शिथिल- महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

 महाराष्ट्रात कोरोना पार्श्वभूमीवर असलेले सर्व निर्बंध शिथिल- महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. 


महाराष्ट्र राज्याच्या काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात लागू असलेले कोरणा संदर्भातील सर्व निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील निर्णय पण घेतला आहे आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट करून दिली आहे. 


जितेंद्र आव्हाड यांचे वरील ट्विट ट्विटर वर पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 माननीय जितेंद्र आव्हाड यांचे twit नुसार "आज मंत्रिमंडळात कोरोना सर्व निर्बंध एक मताने उठवण्यात आले गुढीपाडव्याच्या मिरवणुका जोरात काढा रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणुका जोरात काढा."

 अर्थात महाराष्ट्रात आता कोरोना संदर्भातील लागू असलेले सर्व निर्बंध शिथील केले असल्याच आपल्याला यावरून लक्षात येते. 

या अगोदर कोणताही मोठा कार्यक्रम साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी त्यासाठी आवश्यक होते आता अशी परवानगी आवश्यक नसणार आहे. 

या महिन्यात येणाऱ्या सण आणि उत्सव संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे उद्याच असलेला गुढीपाडवा त्यानंतर येणारे रमजान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, गुड फ्रायडे, ईस्टर संडे हे येणारे सर्वधर्मीय सण उत्सव आता महाराष्ट्रातील सर्व लोक उत्साहाने एकत्र येऊन साजरे करु शकतात. 

वेगवेगळी आस्थापने मर्यादित संख्येमध्ये सुरू होती ती पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकतात. 

महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या ऑफिस मध्ये सर्वसामान्य जनतेला जाण्यायेण्याचे निर्बंध देखील शिथिल होऊ शकतात. 

महाराष्ट्र शासनाने या अगोदरच बऱ्याच गोष्टी पूर्णक्षमतेने व सर्वसामान्य जनतेसाठी खुल्या केलेल्या आहेच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने काल गेल्या निर्णयानुसार ज्या ठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लादले गेलेले आहेत ते निर्बंधही आता पूर्णपणे शितील झाल्याचे सूचक विधान महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून त्यांनी केलेल्या ट्विट वरून आपल्या लक्षात येते. 

मंत्री मंडळाच्या झालेल्या या निर्णयावरून सविस्तर शासन निर्णय आणि सूचना आज निर्गमित होणे अपेक्षित आहे. 

मात्र राज्यातील शाळा संदर्भातील असलेले निर्बंध जसे की सर्व शाळेतील विद्यार्थी एकत्र येऊन प्रार्थना घेणे, शाळेत असलेले शालेय व सहशालेय उपक्रम सर्व विद्यार्थी एकत्र येऊन करणे यासाठी महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभाग काय निर्णय घेतो हे आपल्याला येत्या काही दिवसात शासन निर्णय वरून लक्षात येईलच. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.