शाळा सिद्धि ची (मोबाईल वरून) माहिती कशी भरावी संपूर्ण माहिती

 शाळा सिद्धि ची (मोबाईल/ पीसी /लॅपटॉप वरून) माहिती कशी भरावी? 

 संपूर्ण माहिती..

मित्रहो केंद्र शासनाने भारतातील सर्व शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी व निश्चित करण्यास साठी काही मानांकन ठरवून शाळा सिद्धि नावाच्या पोर्टलवर शाळांनी शाळांचे स्वयंमूल्यमापन करून त्यानंतर त्यावरून शाळांचे बाह्य मूल्यांकन करून शाळा कोणत्या श्रेणीत आहे हे ठरवून देण्यात येणार आहे व त्यानुसार दरवर्षी शाळांनी आपली आपला दर्जा व गुणवत्ता सुधारून सर्व शाळा अ श्रेणीत येतील यासाठी प्रयत्न करायचे आहे. 

महाराष्ट्रातील 100% शाळांनी 30 एप्रिल 2022 पर्यंत शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे चे सहसंचालक यांचे पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

त्यासाठी शाळांना सर्वप्रथम दर वर्षीचे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे यावर्षीचे म्हणजे शैक्षणिक सत्र 2021 22 मूल्यमापनासाठी शाळा सिद्धि पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ते आपण आपल्या मोबाईल वरुन देखील टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे भरून करू शकतो. 


त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील अथवा पीसी मधील गुगल मध्ये शाळा सिद्धि 2021 22  सर्च करावे त्यामधील सर्व प्रथम येणाऱ्या सजेशन वर क्लिक करावे.  


आपल्यासाठी पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल यामध्ये आपल्या शाळेचा यु डायस हाच युजर आयडी म्हणून वापरावा व आपण यापूर्वी वापरलेला ला पासवर्ड टाकून सबमिट केल्यास आपल्या शाळेचे लोगिन उपलब्ध होते. 


अचूक युजर आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर पुढीलप्रमाणे विंडो ओपन होते त्यामध्ये 2021 22 या वर्षात आपण स्वयम् मुलगा आपणास सुरुवात करायची आहे. 

तुमच्या डाव्या बाजूला लाल रंगाचे बॅकग्राऊंड मध्ये सर्व मेनू आपल्याला दिसत आहे. गरज भासल्यास यूजर रिक्वेस्ट मॅनेज करून घ्या आणि स्वयंमूल्यमापन आला त्यानंतरच्या मिनी वरून सुरुवात करा. 



Learners मिनी वर क्लिक केल्यानंतर आपणास पुढील प्रमाणे बिल ओपन होईल त्यामध्ये आपल्या शाळेतील एकूण जात वार पटसंख्या व वर्गवार मुले-मुली यांची संपूर्ण माहिती भरून घ्यावी. 



Learners profile ची संपूर्ण माहिती भरुन झाल्यानंतर. Learning outcomes वर click केल्यावर ओपन झालेल्या विंडो मधील मागील वर्षीच्या निकालानुसार विद्यार्थ्यांच्या लर्निंग outcomes पूर्ण भरून सबमिट बटन वर् Click करा. 

त्यानंतर परफॉर्मन्स इन् की सब्जेक्ट वर क्लिक केल्यानंतर पुढीलप्रमाणे विंडो ओपन होते त्यामध्ये मागील वर्षीच्या वार्षिक निकालानुसार प्रथम भाषा व गणित द्वितीय भाषा गणित विज्ञान आणि सोशल सायन्स या विषयाची विद्यार्थी माहिती पूर्ण भरा. 

वरील प्रमाणे लर्नर्स प्रोफाइल पूर्ण भरून झाल्यानंतर टीचर्स प्रोफाइल हा मेनू ओपन करा त्यामधील कॅटेगिरी वाईस शिक्षक संख्या भरा सबमिट बटन क्लिक करा. 
त्यानंतर टीचर्स प्रोफाईल मध्ये टीचर्स अटेंडन्स ओपन करा. . 

टीचर्स अटेंडन्स मधील एका महिन्यापेक्षा अधिक राज्य असलेल्या शिक्षकांची संख्या आणि एका आठवड्यापर्यंत सुट्टीवर असलेल्या शिक्षकांची संख्या टाकून सब्मिट बटन वर क्लिक करा. 


यानंतर स्कूल व्हॅल्युएशन कंपोझिट मॅट्रिक्स मेनू ओपन करा व या मेनू एकूण सात भागांपैकी पहिल्या भागांपासून माहिती भरण्यास सुरुवात करा. 


शाळेत उपलब्ध असलेल्या संसाधनांची माहिती ते योग्यरित्या काम करत आहे की नाही या संदर्भातील माहिती पूर्णपणे भरून घ्या.. 

अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन यासंदर्भातील नऊ उद्या संदर्भातील माहिती ती आपल्या शाळेत असलेल्या परिस्थितीनुसार योग्य लेबलवर टिक करून नेक्स्ट डोमेन वर क्लिक करा. 


आपल्या शाळेतील विद्यार्थ्या संदर्भात त्यांचे अवधान आणि विकास या संदर्भातील पाच मुद्द्यात मधील योग्य त्या लेव्हल वर क्लिक करा माहिती सबमिट करून नेक्स्ट डोमेन वर क्लिक करा. 


अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी शिक्षकांनी कोण कोणते प्रयत्न केले या संदर्भातील माहिती दिलेल्या सहा मुद्द्याच्या आधारे आपल्या शाळेतील शिक्षकांनी संदर्भात योग्य त्या लेव्हल वर क्लिक करून सबमिट करा आणि नेक्स्ट डोमेन वर click करा. 

शाळेतील नेतृत्व संदर्भात आणि व्यवस्थापना संदर्भातील दिलेल्या चार मुद्यांना अनुसरून आपल्या शाळेतील व्यवस्थापन आणि नेतृत्व कोणत्या लेव्हल वर आहे त्यावर क्लिक करा माहिती सबमिट करा व नेक्स्ट डोमेन वर क्लिक करा. . 

आपल्या शाळेत च्या संदर्भातील समावेशीत आरोग्य आणि सुरक्षा या संदर्भातील दिलेल्या 5 मुद्द्यांची माहिती लक्षात घेऊन आपली शाळा कोणत्या लेवल वर आहे त्यावर क्लिक करून माहिती सबमिट करा आणि नेक्स्ट डॉन वर क्लिक करा. 

आपल्या शाळेच्या संदर्भातील लोकसहभाग या संदर्भाने दिलेल्या पाच मुद्द्याच्या आधारे आपली शाळा त्या मुद्द्यानुसार कोणत्या लेबलवर आहे त्यावर क्लिक करा माहिती सबमिट करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा. 

आपल्या शाळेची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी आपला पुढील कृती कार्यक्रम दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कसा असणार आहे या संदर्भातील माहिती इंग्रजीमध्ये अगोदर लिहून घ्या त्यानंतर ही माहिती लिहिलेली मुद्द्यांच्या परत आल्यावर समोर कॉपी पेस्ट करा म्हणजे परत परत माहिती भरण्याचा त्रास वाचेल कारण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती टाईप करण्यासाठी लागणारा वेळ खूप असेल आणि तोपर्यंत आपले शाळा सिद्धि लोगिन लॉग आऊट होऊन जाईल त्यामुळे मुद्दे वाचून व्हाट्सअप वर किंवा नोट वर त्याची नोंद घ्या त्या संदर्भात संपूर्ण माहिती लिहून घ्या आणि तिकडून कॉपी करून दिलेल्या मुद्द्यांच्या समोर त्या संदर्भातील माहिती पेस्ट करा म्हणजे वेळेचा अपव्यय होणार नाही. 

वरील काम करण्यासाठी आपल्याला त्यांच्या ब्लॉगवर दिलेले सर्व स्क्रीन शॉट उपयोगी पडतील त्यामुळे संपूर्ण पोस्ट वाचून स्क्रींशोट पाहून जर अगोदरच आपण माहिती तयार करून ठेवली तर एकदा लॉगिन झाल्यानंतर संपूर्ण माहिती एकाच वेळी आपण भरू शकतात. 


संपूर्ण माहिती भरुन झाल्यानंतर सदर माहिती फायनल सबमिट करण्याअगोदर पुन्हा एकदा नजरेखालून घाला काही राहून गेले असतील काही नजरचुकीने चुकले असेल तर ते दुरुस्त करून घ्या आणि त्यानंतरच फायनल सबमिशन करा. 

वरील प्रमाणे शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन आपण आपल्या स्मार्टफोन वरून किंवा लॅपटॉप पीसी वरून पूर्णपणे भरू शकता माहिती भरणे अवघड नाही एकेक मुद्दा वाचून व्यवस्थित रित्या आपल्या शाळे संदर्भात विचार करून माहिती भरण्यास आपला दुसऱ्या कडे जाण्याचा वेळही वाचेल आणि माहिती देखील अचूक भरली जाईल त्याबरोबरच आपणास आर्थिक झळही पोहोचणार नाही. 

माहितीसह फायनल सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढण्यास विसरू नका जर आपल्याकडे प्रिंटर  उपलब्ध नसेल तर सदर ची प्रिंट आपण पीडीएफ स्वरुपात आपल्या मोबाईल लॅपटॉप मध्ये सेव करून ठेवू शकता व मिळेल त्याठिकाणी प्रिंट नंतर काढू देखिल शकता. 

माहिती भरताना काही अडचण आल्यास आपण आम्हाला व्हाट्सअप द्वारे किंवा ई-मेलद्वारे संपर्क करू शकता आता आपणास नक्की मदत केली जाईल. 

दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.