संत तुकाराम महाराज- जीवन परिचय..
संत तुकाराम महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू नावाच्या गावात सण 1598 मध्ये झालं त्यांच्या जन्मदिवसा बाबत विद्वानांमध्ये मतभेद आहे तरीदेखील सर्व दृष्टिकोनातून विचार केला असता 1520 मध्ये त्यांचा जन्म झाला असावा असे समजते. पूर्वेकडील विश्वंभर बाबा यांचे कुळात विठ्ठलाची उपासना बरोबर होत होती यांच्या कुळातील सर्व लोक पंढरीची वारी नियमित करत असत देहू गावचे महाजन असल्याकारणाने त्यांचे कुटुंब प्रतिष्ठित कुटुंब मानले जायचे त्यांच्या बाल्यावस्थेत आई कनकाई व वडील वाल्होबा यांच्या देखरेखीत अत्यंत लाडात प्रेमात गेले. तुकाराम महाराज जेव्हा अठरा वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी यांचा स्वर्गवास झाला आणि याच वेळी वेळेस देशात भीषण असा दुष्काळ देखील पडला होता आणि त्यामुळे त्यांची पहिली पत्नी आणि छोटे मुलं दुष्काळा मुळे मृत्यू पावले. या सर्व व परिस्थितीला तोंड दिल्यामुळे संत तुकाराम यांचे मन संसारातून उठून गेले. संत तुकाराम यांची दुसरी पत्नी जिजाबाई यांना यामुळे बराच त्रास सहन करावा लागला. परंतु संत तुकाराम हे संसारापासून विरक्त झाले. मनाला शांती मिळेल या हेतूने संत तुकाराम रोज देहू गावच्या जवळ टेकडीवर जात असत आणि विठ्ठलाचे नाम स्मरण करत आपला दिवस घालवत असत.
प्रपंचा पासून मुक्त झाल्यामुळे आणि परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संत तुकाराम करत असलेल्या या प्रयत्नाला जोड म्हणून बाबा चैतन्य जी नावाच्या या गुरुने त्यांना 1541 साली राम कृष्ण हरी असा मंत्र दिला. त्यानंतर 17 वर्ष त्यांनी समाजाला समतेचा संदेश देण्यात व्यतीत केले. खरे वैराग्य धारक आणि क्षमाशील अंतःकरणाचे संत तुकाराम महाराज बऱ्याच लोकांच्या चर्चेचा विषय बनले परंतु निंदा करणाऱ्यांनाच नंतर पश्चाताप होऊन ते संत तुकाराम यांचे सारखे विठ्ठलाचे निस्सिम भक्त बनले. शकीब पंधराशे 61 मध्ये संत तुकाराम वैकुंठवासी झाले.
संत तुकाराम यांच्या मुखातून सहज निघणारे अभंग लोकांना समतेची शिकवण देऊन गेले. जवळपास चार हजार अभंग संत तुकाराम यांचे शिष्य यांनी लिहून ठेवले आहेत.
संत तुकारामांच्या अभंगातून त्यांच्या परमार्थी जीवनाचे दर्शन होते. संसारी जीवनाला कंटाळून जेव्हा एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार होतो याची स्पष्ट रूप देखिले तुकाराम यांच्या अभंगातून आपल्याला जाणवते.
ईश्वरप्राप्तीची साधना पूर्ण झाल्यानंतर संत तुकाराम यांच्या वाणीतून चे उपदेश अभंगाच्या स्वरूपात तिने बाहेर आले ते अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे.
स्वभावाने अतिशय परखड असल्यामुळे त्यांच्या अभंगात देखील त्यांचा परखडपणा आपल्याला दिसून येतो. अशावेळी समाजावर सावकार आणि इतर अनिष्ट रूढी परंपरांचा पगडा होता या पासुन समाजाला वाचवण्यासाठी त्यांनी ही परखड अभंग वाणी समाजाला उद्देशून लिहिली आहे. ते नेहमी सत्याच्या मार्गावर चालले त्यामुळे कोण दुखावले गेले आणि कोण खूष झाले याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. धर्माच्या नावाखाली ज्या ज्या अनिष्ट रूढी आणि परंपरा लोक पाळत होते अशा गोष्टींवर त्यांनी आपल्या अभंगातून टीका केली. दांभिक संत अनुभव शून्य पोथी पंडित दुराचारी धर्म गुरु इत्यादी समाजकंटकांवर त्यांनी तीव्र अशी टीका केली आहे.
संसाराच्या सुखापासून परावृत्त होऊन परमार्थाचे शाश्वत सुख मनुष्याने प्राप्त केले पाहिजे असे त्यांचे मत होते परंतु त्यासाठी संसाराचा त्याग करा असे मात्र त्यांनी कधीच सांगितले नाही.
संत तुकाराम यांची काव्यरचना केवळ अभंग या छंदांमध्ये आहे तर त्यापैकी काही ही रूपकात्मक रचना देखील आहेत. कमी शब्दात खूप सारा अर्थ व्यक्त करणे हे कौशल्य त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसून येते.
संत तुकाराम यांचे अभंग वाणी सर्वसाधारण जनतेला देखील प्रिय वाटते याचं मुख्य कारण म्हणजे माणसाच्या हृदयात असलेले सुख दुख आशा-निराशा राग लोभ याचं प्रकटीकरण त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसून येते. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन त्यांच्या जीवन काळामध्ये तिला अधिक उंचीचे स्थान मिळवून देण्याचे काम संत तुकाराम यांनी यांनी केले. त्यांनी अध्यात्माला सुलभ केले तर भक्तीचा मार्ग आबाल वृद्धांसाठी सहज सुलभ आणि उज्वल करून दिला.
संत श्री तुकाराम यांनी सर्व मनुष्यही परमपिता ईश्वर यांचे लेकरे आहेत आणि त्यामुळे सर्व समान आहेत. महाराष्ट्राच्या तत्कालीन सामाजिक विचारावर त्यांचा परिणाम दिसून येतो. जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था याला लवचिक बनवण्याचे काम करण्यामध्ये संत तुकाराम यशस्वी झाले. महाराष्ट्रधर्म या संकल्पनेचा चा उपयोग सर्व समाजाला एकत्र बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील उपयोग केला.
संत तुकाराम यांची गाथा वाचण्यासाठी
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
धन्यवाद!
0 Comments