राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील सखी सावित्री समितीच्या गठणाबाबतची माहिती सादर करणेबाबत

राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील सखी सावित्री समितीच्या गठणाबाबतची माहिती सादर करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संदर्भ :-१) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र. ३९/एसडी- ४, दिनांक - १०/०३/२०२२

२) या कार्यालयाकडील पत्र जा.क्र. प्राशिसं / ८०२/सखी सावित्री समिती/संकीर्ण/५८५६, दिनांक -०२/०९/२०२४

३) मा. अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र. २८१/एसडी-४, दिनांक ०४/०९/२०२४

उपरोक्त संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे.

शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १०.०३.२०२२ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला- मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समता मुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करणेबाबत शासना मार्फत निर्देश जारी केलेले आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यात शाळा, केंद्र व तालुका/शहर साधन केंद्र स्तरावर गठीत झालेल्या सखी सावित्री समिती बाबत अद्यावत माहिती सादर करणेबाबत आपणास संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतु अद्याप आपले विभागाकडील एकत्रित माहिती संचालनालयास प्राप्त झालेली नाही.

संदर्भीय पत्र दिनांक ०४/०९/२०२४ च्या शासन पत्रानुसार राज्यातील विभागनिहाय सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या किती शाळांमध्ये सदर समितीचे गठन झालेले आहे व त्या कार्यान्वित आहेत अथवा नाही याबाबतची संख्यात्मक माहिती शासनास सादर करावयाची असल्याने आपल्या विभागाकडील एकत्रित माहिती दिनांक २३/१०/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत कार्यालयीन email - depmah2@gmail.com वर संचालनालयास सादर करावी.


सहपत्र :- वरीलप्रमाणे


 (देविदास कुलाळ)

शिक्षण उपसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत -

१) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर. २) मा. अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर.



संदर्भित आदिशासह संपूर्ण शासनादेश स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी राज्याच्या शिक्षणाची राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याबाबत व सती सावित्री समिती गठित करण्याबाबत निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकांच्या अंमलबजावणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


महोदय,


राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी / विद्यार्थीनोंच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून गज्यानीन्न शाळांमध्ये "तक्रारपेटी" बसवण्याबाबत संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०५ मे, २०१७ च्या शासन परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला- मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समता मुलक वातावरण निर्मितीसाठी संदर्भ क्र. २ येथील दिनांक १० मार्च. २०२२ च्या शासन परिपत्रकान्वये विविध स्तरावर "सखी सावित्री" समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संदर्भाधीन क्र. १ व २ येथोल शासन परिपत्रकानुसार करण्यान आलेल्या कार्यवाहीयावतची सद्यस्थिती शासनास तात्काळ सादर करण्यात यावा. तसेच ज्या शाळांमध्ये सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात आलेली नसेल, त्या शाळांमध्ये पुढील आठ दिवसात कार्यवाही करण्याच निर्देश आपल्यास्तरावरून संबंधितांना देण्यात यावेत. विहित मुदतीनंतरही संदभर्भाधीन शासन परिपत्रकांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या संबंधितांवर यथायोग्य कारवाई करण्यात यावी, ही विनंती.


(अ.अ. कुलकर्णी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन





सखी सावित्री मंच स्थापनेबाबत- 

शासन निर्णय 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठण करणे बाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

सदर सत सावित्री समितीही स्तरावर वेगवेगळी असणार आहे ती शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षच या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.



शाळा शहराप्रमाणेच केंद्र आणि तालुका स्तरावर देखील सखी सावित्री समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्र स्तरावर केंद्रप्रमुख या समितीचे अध्यक्ष असणार आहेत तर तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असणार आहे.

तिन्ही स्तरावर असलेल्या सखी सावित्री समितीचे कार्य या आदेशात सविस्तर नमूद करण्यात आले आहेत.


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 


Download


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.