पुढच्या वर्षीपासून बदलणार पाठ्यपुस्तके व 1 ली ते 8 वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश - शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य

 पुढच्या वर्षीपासून बदलणार पाठ्यपुस्तके 

1 ली ते 8 वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश -

 शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य. 


पुढच्या वर्षीपासून बदलणार पाठ्यपुस्तके. 

माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी विधानपरिषदेत केलेल्या घोषणेनुसार पुढील वर्षी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेता मराठी माध्यमाच्या या पुस्तकात देखील काही महत्वाचे शब्द इंग्रजीतून देखील छापलेली असणार आहेत. अशी द्विभाषी पुस्तके प्रायोगिक तत्त्वावर मागील वर्षी काही तालुक्यांमध्ये वापरण्यात आली होती. या पुस्तकांची उपयुक्तता लक्षात घेता मराठी माध्यमांच्या शाळांसाठी तयार करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांचा समावेश होणार असल्यामुळे पुढील वर्षी जी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळतील ती पाठ्यपुस्तके बदललेल्या नव्या रुपात असतील त्यामुळे पुढील वर्षी पाठ्यपुस्तकाचे स्वरूप बदलणार आहे. सदर पाठ्यपुस्तकांना  द्विभाषिक पाठ्यपुस्तके असे संबोधले गेले आहे. 

सदरची पाठ्यपुस्तके ही दप्तराचे ओझे कमी करणारे देखील असणार आहेत कारण ही पाठ्यपुस्तके फक्त तीन पाठ्यपुस्तके असतील. ज्यामध्ये हे त्या त्या इयत्तेतील सर्व विषयांचा समावेश असेल म्हणजे सर्व विषयांचे सारखे तीन भाग करून ते सर्व विषय तीन पुस्तकात छापण्यात येणार आहेत. म्हणजे सुरुवातीचा अभ्यासक्रम एका पुस्तकात त्यानंतर चा अभ्यासक्रम दुसऱ्या पुस्तकात तर शेवटचा अभ्यासक्रम तिसऱ्या पुस्तकात असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना सर्व पुस्तक शाळेत न आणता सुरुवातीला एक नंबर चे पुस्तक त्यानंतर दोन नंबर चे पुस्तक तर शेवटी तिसऱ्या क्रमांकाचे पुस्तक शाळेत आणावी लागेल म्हणजे एक पुस्तक शाळेत आणली तरी पुरेसे आहे यामुळे दप्तरांचे ओझे देखील कमी होणार आहे. 



1 ली ते 8 वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश. 

सध्याच्या परिस्थितीत 1ते आठवी वर्गापर्यंत सर्व मुलींना व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि दारिद्र रेषेखालील मुलांनाच मोफत गणवेश मिळतो. 

परंतु पुढील सत्रापासून वर्ग पहिला ते आठवी मध्ये शिकणाऱ्या सरसकट सर्व मुले आणि मुलींना मोफत गणवेश देण्याची घोषणा विधान परिषदेत माननीय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 

ह्या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तर काही विद्यार्थ्यांना गणवेश बाजारातून खरेदी करावा लागत होता हा भेदभाव जो विद्यार्थ्यांसोबत करावा लागायचा तो भेदभाव आता शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना करण्याची गरज नाही कारण सर्वच पहिल्या वर्गापासून तर आठव्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मोफत गणवेश मिळू शकणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये होणारा भेदभाव आता होणार नाही. 


वरील माहिती देणारे ट्विट माननीय शिक्षणमंत्री यांच्या ट्विटर अकाउंट वर उपलब्ध आहे सदरचे वीट पाहण्यासाठी व ट्विटर वरील व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करावे



अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 



व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao




नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group




धन्यवाद! 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.