राष्ट्रीय विज्ञान दिवस भाषण
( विज्ञान शाप की वरदान?)
आजच्या युगात जादू तर शक्य नाही परंतु विज्ञान हे असे एक साधना आहे की ज्याच्यामुळे आपण म्हणजेच मानव प्राणी पर्यंतची प्रगतीची घोडदौड करता आलेला आहे विज्ञान विमान जानवाल सापडलेल्या जादूच्या कांडी पेक्षा कमी नाही.
कारण विज्ञान आणि मानवाच्या अनेक इच्छा पूर्ण केल्या आहेत मानव पक्षाप्रमाणे आकाशात उडू शकतो. माशाप्रमाणे पाण्यात पोहू शकतो. राहू शकतो. अत्यंत वेगवान अशा साधनांचा मानवाने विज्ञानाच्या साह्याने शोध लावला आहे. ज्या गोष्टी पूर्वी मानवी श्रम वापरून दिवसेंदिवस काम करूनही पूर्ण होऊ शकत नव्हत्या अशा गोष्टी यंत्राच्या साह्याने काही दिवसातच पूर्ण होऊ शकतात जसे मोठमोठे रस्ते मोठमोठे पूल फ्लाय ओव्हर बनवणे यंत्राच्या साह्याने या शिवाय शक्य नाही आणि हे यंत्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाने बनवलेले आहेत.
जगभरात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आपण पाहतो जर विज्ञानाने शोध लावून अधिकाधिक उत्पन्न देणारी पिके शोधून काढली नसती तर आज पृथ्वीवरील प्रत्येक माणसाची भूक भागवणे पारंपरिक पिकांच्या माध्यमातून शक्य झाले नसते सर्व मानवाला अन्न पुरेशी ठरू शकले नसते अनेक लोक भुकेने मरण पावले असते म्हणजेच पृथ्वीवरील प्रत्येक माणसाची भूक भागवण्याचे काम विज्ञानाच्या साह्याने माणसाने पूर्ण केले आहे.
अत्यंत सुसह्य असे प्रत्येक कामासाठी यंत्रसामुग्री मानवाने विज्ञानाच्या साह्याने तयार केली आहे तर सूक्ष्मातील सूक्ष्म यंत्र देखील माणसाने विज्ञानाच्या साह्याने तयार केलेली आहेत यंत्र माणसाला दैनंदिन जीवनात अगदी छोट्या कामापासून तर मोठमोठ्या कामं पर्यंत ते पूर्ण करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतात.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विज्ञान यांनी एवढी प्रगती केली आहे की जगातील कोणतीही बातमी आपल्यापर्यंत अगदी काही क्षणात दृकश्राव्य साधनाच्या स्वरूपात अगदी जशीच्या तशी आपल्या डोळ्याने पाहता येते कानाने ऐकता यते आणि इत्यंभूत माहिती आपल्या पर्यंत पोहोचते. आपली जवळच्या व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असल्या तरी मोबाईल फोन्स वरील व्हिडिओ कॉल्स च्या माध्यमातून आपण त्यांना केव्हाही पाहू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो ही सर्व मानवी जीवनातील क्रांती विज्ञान मुळे शक्य झाली आहे.
विज्ञान आणि आपले संपूर्ण जीवन व्यापले आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञान आपल्याला उपयोगी ठरले आहे. छोट्याशा सुईपासून तर मोठमोठ्या जहाजानं पर्यंत मोठ मोठ्या यंत्रांत पर्यंत सर्व शोध विज्ञानाच्या मदतीने माणसाने लावले आहेत आणि मानवी जीवन सुकर सहज करण्यासाठी या सर्वांचा वापर मानव प्राणी करत आहे.
ज्याप्रमाणे विज्ञानामुळे मानवी जीवनावर चांगले परिणाम घडून आलेले आहेत त्याचप्रमाणे वैज्ञानिक शोधांमुळे मानवाने आपली नैसर्गिक जीवन पद्धती बदलून विज्ञान नाने लावलेल्या शोधांचा वापर करत नवीन जीवन पद्धती स्वीकारली आहे आणि या नवीन जीवनपद्धतीमुळे वेगवेगळे विकार आजार नवनवीन प्रकारच्या रोगाच्या साथी ह्या मानवी जीवन विस्कळीत आणि व्यथित करत आहेत आत्ताच येऊन गेलेली किंवा जगाव वर खूप मोठा परिणाम करणारी covid-19 ह्या रोगाची साथ ही एका वैज्ञानिक प्रयोगशाळेत झालेल्या दुर्घटनेमुळे आली. असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे विज्ञान फक्त मानवी जीवनात मानवाचे कष्ट कमी करण्याचे काम करते असे नाही तर मानवी जीवनात नवीन प्रश्न निर्माण करण्याचे काम देखील विज्ञानाने केले आहे असे म्हणावे लागेल. मग जे आपली पूर्वज किंवा वडीलधारी मंडळी आपणास म्हणतात की खेड्यातील आपले निसर्गाच्या सानिध्यातील कमीत कमी यंत्राचा वापर करून जगत असलेले जीवनच चांगले होते हे आपल्याला सत्य वाटायला आणि पटायला लागते.
विज्ञानाच्या मदतीने मानव प्राणी रोज नवनवीन शोध लावत आहे आणि या शोधांच्या मदतीने मानवी जीवन समृद्ध करण्याचे काम जरी विज्ञान करत असले तरी विज्ञानाचा उपयोग काही विध्वंसक वृत्ती चे मानवत मानव जातीच्या विनाशासाठी वापर करण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे विज्ञानाने वॉशिंग मशीन फ्रिज यासारखे शोध लावले त्याच प्रमाणे विज्ञानाने अनु बॉम सारख्या वेगवेगळ्या विध्वंसक शस्त्रास्त्रांचा देखील शोध लावला आणि आजच्या परिस्थितीनुसार जगावर तिस-या महायुद्धाचे संकट याच साधना च्या जोरावर काही देश लादू पाहत आहे. जर प्रत्येक देशातील विध्वंसक शस्त्रास्त्रे वापरली गेली तर पृथ्वीवरील समूळ मानव जात नष्ट करण्याची शक्ती या सर्व शस्त्रास्त्रांनी मध्ये आहे म्हणून विज्ञान हे दुधारी तलवारी प्रमाणे आहे जर आपण त्याचा वापर आपल्या चांगल्या कामासाठी उपयोगासाठी केला तर ते आपल्याला आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि जर आपण त्याचा वापर विध्वंसक गोष्टीसाठी केला तर ते आपल्यासाठी विनाशाचे कारण देखील ठरू शकते.
सर्व परिस्थिती लक्षात घेता आपणास प्रश्न पडतो की मग विज्ञान हे शाप आहे की वरदान आहे तर या प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला गेलो तर विज्ञान हे मानवाने जशी वापरले जसा त्याचा उपयोग केला तशी आहे जर विज्ञानाचा उपयोग विध्वंसक कार्यासाठी करण्यात आला तर विज्ञान आपल्याला शाप वाटायला लागेल आणि विज्ञानाचे उपयोग आपण मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी केला तर विज्ञान नक्कीच आपल्यासाठी वरदान ठरते.
जरी विज्ञान आणि आपल्यासाठी वेगवान साधने शोधली तरी या वाहनांमुळे प्रदूषण सारखी समस्या निर्माण झाली आहे.
जरी विज्ञान आणि विमानाचा शोध लावला तरी विमान कोसळण्याच्या घटना देखील आपणास परिचित आहे.
जरी विज्ञानाने अन्न दीर्घ काळ टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रिझर्वेटिव्ह चा शोध लावला तरी या प्रिझर्वेटिव्ह मुळे मानवी शरीर वर अनिष्ट परिणाम होत आहेत.
मानवाने वैद्यकीय क्षेत्रात अनेक शोध लावले परंतु त्याची दुष्परिणाम देखील मानवी शरीरावर होत आहेत हे देखील लक्षात ठेवावे लागेल.
दळणवळणातील साधनाच्या प्रगतीमुळे मानव आळशी म्हणून चाललंय याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावे लागेल.
पिकांवरील कीटकनाशकांचे शोध ही अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी जरी उपकारक ठरले असले तरी या कीटकनाशकांचा काही प्रमाणात का होईना मानवी शरीरावर देखील परिणाम होत आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता आपणास असे लक्षात येते की विज्ञानाचा वापर आपण जसा केला तसा उपयोग किंवा दुरुपयोग विज्ञानाचा केला जाऊ शकतो जर मानव आणि सद्सद्विवेक बुद्धी वापरून विज्ञानामुळे मानवी जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच विज्ञान हे माणसासाठी वरदान ठरेल.
..
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
0 Comments