स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक यांचे महत्वाचे परिपत्रक 2021-22
भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2014 पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान याची सुरुवात केली आहे. देशातील सर्व शाळांसाठी सन 2015-16 पासून स्वच्छ भारत विद्यालय पुरस्कार सुरू केला आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 साठी मार्गदर्शक सूचना तसेच शाळांसाठी नामनिर्देशन करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदर पुरस्काराकरिता नामांकन करणाऱ्या यांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवर करण्यात येणाऱ्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय अनुदानित खाजगी शाळा पात्र आहे. त्यांना या पुरस्कारासाठी नामांकन सादर करता येईल पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर 46 राज्य पातळीवर 26 व जिल्हा पातळीवर 38 शाळांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेकरता निश्चित करण्यात आलेल्या सहा उपघटकांसाठी एकूण 60 निर्देशांक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेऊन श्रेणी देण्यात येणार आहे. सदर पुरस्कारासाठी शाळांनी नामांकन सादर करण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2022 आहे. खालील दिलेल्या पत्रातील संकेतस्थळावर किंवा प्ले स्टोअर किंवा एप्पल ॲप स्टोअरवर उपलब्ध स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021- 22 या ॲप वर शाळेचा यु डायस कोड वापरून नोंदणी करावी. अशा सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे चे संचालक एम डी सिंह यांनी दिनांक 24-1-2022 या पत्रानुसार केली आहे.सदर पत्राचा फ़ोटो खाली दिलेला आहे.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार साठी ऑनलाईन नामांकन सादर करण्याची दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस आहे. तर जिल्हा सरावर पडत शाळांची पडताळणी ची मुदत एक एप्रिल ते 15 मे 2022 पर्यंत आहे. पुरस्कार निवड केलेल्या शाळांची यादी पाठवा मुदत 22 मे 2022 पर्यंत पुरस्कारासाठी शाळांची पडताळणी व निवड 22 मे 2012 पर्यंत करण्यात येईल तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शाळांची पडताळणी व निवड 22 मी ते 30 जून 2022 पर्यंत करण्यात येईल राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेल्या शाळांची यादी सादर करण्याची मुदत 1 जुलै ते 7 जुलै 2022 आहे. 1 जुली ते 7 जुलै राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेल्या शाळांची यादी सादर करण्यासाठी 7 जुलै ते 7 सप्टेंबर 2022 राज्यस्तरावरून शाळांची पडताळणी होईल आणि सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर 15 ऑक्टोबर 2022 रोजी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येईल. असे देखिल या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सदर पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा..
स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचा शासन आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
अशाच प्रकारची महत्त्वाची शैक्षणिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हे शब्द..
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी आमच्या खालील युट्युब चॅनल ला.. व लाईक शेअर कमेंट करण्यास विसरू नका..
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!!
0 Comments