दरवर्षी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याबाबत शासन आदेश

दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. 


प्रस्तावना :

शासनामार्फत दरवर्षी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. दिनांक १९ फेब्रुवारी चे औचित्य साधून या थोरपुरूषांचे ज्या-ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेत, तेथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी. तसेच ज्या-ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे/स्मारके आहेत त्या परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणांकडून रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभिकरण करून घेण्यात यावे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सार्वजनिक कार्यक्रम करताना राज्याच्या राज्य गीताचे गायन करण्यासंदर्भात सन २०२३ व २०२४ मध्ये स्वतंत्ररित्या परिपत्रक निर्गमित करण्यात येत होते. दरवर्षी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत असल्याने आगामी वर्षांसाठी सुचनांचे स्थायी परिपत्रक निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.

परिपत्रक :

२. छत्रपती शिवाजी महाराजांची दरवर्षी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून या थोरपुरुषांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे /स्मारके आहेत, तेथे रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभिकरण करुन घेऊन ते झाल्याची खातरजमा संबंधित विभाग प्रमुख यांनी करुन घ्यावी.

३. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. सदरच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करुन सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. तद्नंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात यावे.

४. उपरोक्त उल्लेखित उपक्रम यशस्वीरित्या पार पाडावयाचे असल्याने, त्याचे योग्य व काळजीपूर्वक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी दिनांक १९ फेब्रुवारी, रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे सर्व बाबींची काटकोरपणे नियोजन करुन अंमलबजावणी करावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा सांकेतांक २०२५०२१४१६३२१६०००७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,


(सचिन कावळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन


 “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” मार्गदर्शक सूचना.. 

शासन परिपत्रक.. 


वरील  शासन परिपत्रक pdf स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार  19 फेब्रु रोजी महाराष्ट्रभर हा  मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोरोना विर्षाणूच्या ओवमक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा न करता स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या दृष्ट्टीकोनातून काळजी घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत.:-

1. Covid- 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल नियम, आपत्ती व्यवस्थापन, मदत ि पुनिगसन विभागाचे पवरपत्रक क्र.- DMU/ 0404/ CR.90/DisM-1, वद. 8/1/0400 तसेच क्र. DMU/0404/ CR.90/DisM-1, वद. 31/1/ 0400 अंतगगत वदलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. 

2. दिनांक 19 फेब्रू, २०२२ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” शिवजयंती साजरी करत असताना शिवज्योत वहना करिता 200 भाविकांना उत्सवा करिता 500 भाविकांना परवानगी देण्यात येत आहे.

3. अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी आणि इतर गड/ किल्ल्यावर जाऊन तारखेनुसार वद. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्साहात साजरा करणे अपेक्षित आहे.

4. दरिर्षी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी संस्कृतीक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाची  केबल नेटिकग ऑनलाइन  उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

5. प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/ प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून  त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स इन पालन करून छत्रपती “ शिवाजी महाराज जयंती” साजरी करावी.

6. “छत्रपती शिवाजी महाराज जयंती”च्या दिवशी आरोग्य विषयक उपक्रम/(उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावेत त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार  त्यांचे प्रवतबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विर्षयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डीस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅवनटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

7. कोविड- 19 च्या विर्षाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण  विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या  परिपत्रकां नंतर सण सुरु होण्याच्या मधल्या कालािधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.