आजच्या शैक्षणिक संस्था/शाळाच्या समोरील
आव्हाने आणि त्यावरील उपाय..
बदलत्या काळानुसार विद्यार्थी पालक आणि समाजाच्या शैक्षणिक संस्था आणि शाळा यांच्या कडून अपेक्षा देखील बदलल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करता करता शैक्षणिक संस्था आणि यांच्यासमोरील आव्हाने देखील तशीच, तेवढीच वाढली आहे.
आपण आज विचार करूया की या शैक्षणिक संस्था आणि शाळा समोर कोण कोणती आव्हाने आहेत आणि त्यावर कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
इतर शैक्षणिक संस्था आणि शाळां सोबत स्पर्धा करण्याच्या आव्हान..
पालकांच्या आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान..
साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आव्हान..
कौशल्य आणि क्षमता धारक मनुष्यबळ उपलब्धतेचे आव्हान..
वेगवेगळे बदल स्वीकारून वेळोवेळी बदलत्या स्वरूपात देखील टिकून राहण्याचे आव्हान..
जाहिरातीच्या काळात टिकून राहण्याचे आव्हान..
नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे व ते वापरण्याचे आव्हान..
शालेय व सहशालेय उपक्रम राबवताना येणारी आव्हाने..
मैदानासाठी जागा उपलब्धतेचे आव्हान.. .
इतर शैक्षणिक संस्था आणि शाळां सोबत स्पर्धा करण्याच्या आव्हान..
आजच्या परिस्थितीत शहरात किंवा खेड्यात देखील रोज नवनवीन शाळा उघडतांना दिसताय आणि या शाळा रोज नवीन एक संकल्पना घेऊन आपले मार्केटिंग करून आपल्याकडे विद्यार्थी व पालकांना खेचून घेण्याचा देखील प्रयत्न करत आहेत म्हणजेच शिक्षण क्षेत्रात देखील आता स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि या निर्माण झालेल्या स्पर्धेच्या काळात टिकून राहणे हे खूप मोठे आव्हान शाळा आणि शैक्षणिक संस्था यांच्यासमोर उभे राहिले आहे. मग ही स्पर्धा गुणवत्तेची असो की भौतिक गोष्टींची जर दुसरी शाळा या बाबतीत सरस ठरत असेल तर त्या शाळे सारखा किंवा त्यापेक्षा अधिक ती भौतिक गोष्ट किंवा गुणवत्ता आपल्या शाळेत कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे आणि आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे हे त्यात या सर्व शैक्षणिक संस्था यांना गरजेचे भासते यामुळे इतर शैक्षणिक संस्था आणि शाळा यांच्यासोबत स्पर्धा करणे हे एक महत्त्वाचे आव्हान आजच्या शैक्षणिक संस्था आणि शाळांसमोर आहे..
उपाय..
कमीत कमी साधनांचा अधिकाधिक नियोजनपूर्वक उपयोग करणे आणि त्यामधून अधिकाधिक गुणवत्ता आणि भौतिक गोष्टींची पूर्तता करणे ह्या गोष्टी शैक्षणिक संस्था व शाळांसाठी आवश्यक ठरतात.. पालकांसाठी गुणवत्ता हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक नाही आणि आपण नियमित गुणवत्ता टिकून ठेवली आणि दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना दिले तर पालकांचा आणि समाजाचा विश्वास आपल्या शैक्षणिक संस्थेवर टिकून राहील आणि मग कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण या स्पर्धेत टिकून राहू हे सर्व शैक्षणिक संस्थांनी समजून घ्यायला हवे.
पालकांच्या आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान..
इतर आस्थापने किंवा दुकान यापेक्षा शैक्षणिक संस्था ही एक वेगळी संस्था आहे.आणि पालक वर्ग व समाज हाही सजीव घटक दिवसभरासाठी या संस्थेत त्यांच्या अत्यंत जवळचे म्हणजेच त्यांचे पालक मुले मुली त्या संस्थेत पाठवत असतात. यामुळे त्यांच्या घरातील एका व्यक्तीला एखाद्या ठिकाणी पाठवणे यासाठी ती शैक्षणिक संस्था किती योग्य अयोग्य आहे याचे मूल्यमापन पालक आणि समाज करत असतो. त्यांच्या पाल्याकडून म्हणजेच त्यांच्या मुला मुली कडून त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करून घेण्याचे माध्यम म्हणजेच शैक्षणिक संस्था या दृष्टिकोनातून ते शैक्षणिक संस्था आणि शाळा यांच्याकडे पाहत असतात. एखाद्या शैक्षणिक संस्थेत आपल्या मुलाला किंवा मुलीचा प्रवेश केला म्हणजे तो आपल्या अपेक्षा पूर्ण करेल अशी त्यांची समज असते. म्हणून पालकांच्या आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान मुलांवर पर्यायाने शैक्षणिक संस्थांवर येऊन पडते.
उपाय..
पालक आणि समाधान च्या अपेक्षा लिखित स्वरूपात मांडणी करून त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून कृती आराखडा तयार केल्यास एक एक उद्दिष्ट साध्य करून इतर उद्दिष्टांकडे लक्ष देऊन ते साध्य करण्यास सोपे जातील. काही अमूर्त गोष्टींवर काम करण्यापेक्षा कौशल्य विकास सारख्या ूर्त व दिसणार्या गोष्टींवर काम केल्यास त्या पालकांना दाखवता येतील व आपल्या संस्थेची व शाळांची गुणवत्ता काय आहे हे पालक विद्यार्थी व समाज यांना दृश्य स्वरूपात दाखवून आपण त्यांच्या काही अपेक्षा तरी पूर्ण करू शकतो. शैक्षणिक संस्थेतील व्यवसायिक अभ्यासक्रम यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास अधिक करून घेता येईल.
साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आव्हान..
शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वेगवेळ्या कौशल्य विकासासाठी विविध शैक्षणिक साधने व इतर भौतिक साधनांची आवश्यकता असते ही सर्व साधने उपलब्ध करून देणे हे प्रथम आव्हान तर आहेच परंतु बदलत्या गरजा नुसार आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार वेळोवेळी अशी साधने बदलून नवीन साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याचे आव्हान देखील शैक्षणिक संस्था आणि शाळा यांच्यासमोर असते या साठी आवश्यक निधी ची तरतूद उपलब्ध करून घेणे किंवा ती तरतूद उपलब्ध करणे हेदेखील शैक्षणिक संस्था शाळा यांच्यासाठी एक आव्हानच आहे. या साधन सामग्री की काही साधन सामग्री ही कायम साधनसामुग्री असते तर काहीच साधन सामुग्री नियमित परत परत घेणे आवश्यक असत ते तर काही साधन सामग्रीची नियमित निगा राखणे देखील गरजेचे असते. ही सर्व साधनसामुग्री बाबत आव्हाने आर्थिक बाबींशी संबंधित असल्यामुळे जोपर्यंत पुरेसा पैसा शैक्षणिक संस्थेला किंवा शाळेला प्राप्त होत नाही किंवा उपलब्ध होत नाही तोपर्यंत ही साधनसामुग्री उपलब्ध होणे देखील कठीण होते.
उपाय..
सदर साधनसामुग्री शासन दरबारी निधीची उपलब्धते संदर्भात वारंवार पाठपुरावा करून उपलब्ध करून घेता येईल.
जर खाजगी शैक्षणिक संस्था असेल तर विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्का मधून देखील आवश्यकतेनुसार खरेदी करता येईल किंवा तयार करता येते.
एखाद्या मोठ्या कंपनीकडून सी एस आर च्या माध्यमातून मोठ्या वस्तू किंवा निधी उपलब्ध करून घेऊन आवश्यक साधन सामग्री शैक्षणिक संस्थेत अथवा शाळेत उपलब्ध करून घेता येईल..
पालक समाजातील प्रतिष्ठित सुज्ञ व्यक्ती सदर शिक्षण संस्थेतील अथवा शाळेतील माजी विद्यार्थी यांना आव्हान करून यांच्याकडून देखील वस्तू स्वरुपात किंवा तर रोख रकमेच्या स्वरूपात मदत मिळवून आवश्यक ती साधन सामग्री आपल्या संस्थेत उपलब्ध करून घेता येईल..
कौशल्य आणि क्षमता धारक मनुष्यबळ उपलब्धतेचे आव्हान..
भारतात स्थानिक भारतीय तरुण बेरोजगार असले तरी त्यांच्याकडे आवश्यक ते कौशल्य आणि क्षमता योग्य त्या प्रमाणात उपलब्ध नाही असे म्हणावे लागेल. कारण जेव्हा एखादी शाळा शैक्षणिक संस्था आपल्या संस्थेत एखादा या पदासाठी अर्ज मागवते आणि क्षमता तपासण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतात त्यावेळी असे लक्षात येते की सदर उमेदवाराने पुस्तकी ज्ञान घेऊन प्रमाणपत्र पुरते परीक्षा देऊन आवश्यक ती प्रमाणपत्रे शैक्षणिक सहल तिची प्रमाणपत्रे मिळवलेली आहे. परंतु त्या पदासाठी आवश्यक कौशल्य आणि क्षमता खूप कमी उमेदवारांमध्ये दिसून येतात यामुळे शाळा आणि शैक्षणिक संस्था यांच्या साठी आवश्यक असलेले कौशल्य आणि क्षमता धारक मनुष्यबळ उपलब्धता. हे देखील एक आव्हान आहे.
उपाय..
कौशल्य प्राप्त आणि क्षमता धारक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी सदर व्यक्तीस योग्य मोबदला म्हणजेच पगार दिल्यास अशा व्यक्ती मिळणे सोपे जाईल.
किमान कौशल्य आणि क्षमता धारक व्यक्तीला नियुक्ती देऊन त्यानंतर त्यांना कौशल्य आणि समता प्राप्त करून देण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे हा देखील यावरील उपाय ठरू शकेल.
वेगवेगळे बदल स्वीकारून वेळोवेळी बदलत्या स्वरूपात देखील टिकून राहण्याचे आव्हान..
शिक्षण क्षेत्रात नियमित कालानुरूप बदल घडून येत असतात जसे बऱ्याचशा शैक्षणिक संस्था मध्ये खडू फळा यांची जागा आता इंटरॅक्टिवे बोर्ड प्रोजेक्टर यासारख्या अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे याप्रमाणे हीच शैक्षणिक संस्था आणि शाळा यांनीदेखील कात टाकून नवीन बदल स्वीकारणे आणि काळानुसार बदल घडून आणणे याचा स्वीकार करायला पाहिजे आणि आपल्या शैक्षणिक संस्था व शाळा यामध्ये बदल घडवून आणणे गरजेचे ठरते.. परंतु काळ एवढ्या वेगाने पुढे जात आहे की आज घेतलेली वस्तू किंवा आज केलेला बदल हा किती काळात कालबाह्य ठरेल हे सांगता येत नाही त्यामुळे ह्या बदलत्या कळत टिकून राहण्याचे आव्हान शैक्षणिक संस्था व शाळा यांच्यासमोर आहे.
उपाय..
शाळा व शिक्षण संस्थेचा प्रमुख आहे यांनी जबाबदारी स्वीकारून काळासोबत टिकून राहण्यासाठी नियमित आवश्यक ते बदल आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये घडवून आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे व शाळेत बदल घडवून आणून आपली संस्था टिकवून ठेवता येईल.
जा पालक पालक व हिरातीच्या काळात टिकून राहण्याचे आव्हान..
जाहिरात ही आजच्या युगातील अविभाज्य भाग भा बनला आहे शिक्षण क्षेत्रात देखील जाहिरातीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या पद्धतीने पालक व विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक संस्थेची व शाळांची जाहिरात करताना आपल्याला दिसतात आणि या जाहिरातीच्या युगात टिकून राहणे हे देखील शैक्षणिक एक संस्था व शाळा यांच्यासमोरील एक आव्हान आहे.
उपाय..
आपल्याला योग्य वाटेल अशा माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधांचा बद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून आपण देखील आपल्या शैक्षणिक संस्थेची व शाळेची जाहिरात करू शकतो व या जाहिरातीच्या काळात देखील टिकून राहू शकतो.
नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे व ते वापरण्याचे आव्हान..
आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे संगणकाचे युग आहे आणि जर असे आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्या शिक्षण संस्थेत उपलब्ध असाव्यात आणि त्याचा वापर करणारे शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग आपल्याकडे उपलब्ध असावी. तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली प्रगती खूप झपाट्याने होणार प्रगती आहे त्यामुळे आज घेतलेले साधन उद्या उपयोगी पडेलच याची खात्री देता येत नाही म्हणून नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी काही मर्यादा येतात आणि ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी आवश्यक तज्ञ व्यक्ती ती मिळणे देखील कठीण जाते नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून ते वापरण्याचे आव्हान शैक्षणिक संस्था व शाळा यांच्यासमोर आहे.
उपाय..
सर्वच गोष्टी लगेच तात्काळ उपलब्ध होऊ शकत नाहीत परंतु किमान गोष्टी आपण आपल्या शैक्षणिक संस्थेत कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी शाळेतील आवश्यक अशा गोष्टींचा प्राधान्यक्रम करून त्यात क्रमाक्रमाने निधी उपलब्धतेनुसार शाळेत उपलब्ध करून घेता येतील.. सदर नवीन तंत्रज्ञान कसे वापरायचे ही शिकण्यासाठी देखील तंत्रज्ञानाचा वापर करता येईल..
शालेय व सहशालेय उपक्रम राबवताना येणारी आव्हाने..
मैदानासाठी जागा उपलब्धतेचे आव्हान.. .
शिक्षण म्हणजे बालकाचा सर्वांगीण विकास आणि हा सर्वांगीण विकास करताना वेगवेगळ्या शालेय व सहशालेय उपक्रम आणि चे आयोजन शैक्षणिक संस्थांना व शाळांना करावे राहते अशावेळी ही शालेय व सहशालेय उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक ती साहित्य व साधने उपलब्ध होतीलच असे नाही. जर क्रीडा स्पर्धा घ्यायच्या आहेत तर प्रत्येक खेळासाठी मैदान उपलब्ध होईलच हे सांगता येणार नाही शहरी भागात तर मैदान उपलब्ध होईल का हेच निश्चित सांगता येणार नाही. एखाद्यावेळेस मैदान उपलब्ध झाले तरी त्यात या खेळांसाठी लागणारे साहित्य उपलब्ध होणे देखील मोठे आव्हान आहे.. ग्रामीण भागातील शाळा व शैक्षणिक संस्थांसाठी अत्याधुनिक खेळाची साहित्य ही खूप दूरची गोष्ट आहे.
उपाय..
शक्य तितकी साधने उपलब्ध करून घेऊन उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कशी भर पडेल याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टींचा वापर उत्साही व क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जर करण्यात आला तरी पुरेसे ठरेल..
अशाप्रकारे शैक्षणिक संस्था आणि शाळा यांच्यासमोर अनेक आव्हाने असली तरी आपण त्यावर योग्य त्या उपाययोजना करून आपल्या शैक्षणिक संस्थेचे आपल्या शाळेचे नाव मोठी करू शकतो.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
0 Comments