शिक्षण प्रक्रिया
(Educational Process)
शिक्षण आणि शिक्षण प्रक्रिया याविषयी आपण काही सर्वसामान्य समज बाळगतो व या समजा विषयी जर उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास 'हत्ती आणि तीन आंधळ्या व्यक्ती' यांची गोष्ट अतिशय समर्पक ठरेल.. गोष्ट अशी की, तीन आंधळ्या व्यक्ती होत्या आणि त्यांना हत्तीला स्पर्श करून हत्तीचे वर्णन करायचे सांगितले जाते, समोर हत्ती बांधलेला असतो व ते तीन आंधळे व्यक्ती इतरांच्या साहाय्याने हत्ती जवळ जातात व प्रत्येक जण हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करतात आणि हत्तीचा आकार कसा आहे याचा आपल्या आपल्या स्पर्श ज्ञानावर अंदाज बांधतो मग ज्याने जी गोष्ट अनुभवली त्यानुसार तो हत्तीचे वर्णन करतो. ज्याने हत्तीच्या कानांना स्पर्श केला तो म्हणतो "हत्ती हा मोठ्या सुपासारखा आहे." तर ज्याने हत्तीच्या पायाला स्पर्श केला तो म्हणतो "हत्ती मोठ्या खांबासारखा आहे." तर तिसरा हत्तीच्या धिप्पाड देहाला स्पर्श करतो आणि तो हत्तीचे वर्णन करतो, "हत्ती हा अतिशय धिप्पाड एखादया व्हेल माश्यासारखा आहे." आता ह्या तीनही आंधळ्या व्यक्तींचं त्यांच्या अनुभवावरून हत्तीचं वर्णन हे अगदी योग्य आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र हत्ती फक्त त्यांनी सांगितला तसाच नाही, त्याचे फक्त कान सुपा सारखे आहेत, त्याचे पाय खांबासारखे आहेत तर त्याचा देह धिप्पाड आहे. त्याला सोंड आहे. देहाच्या तुलनेत त्याची शेपूट मात्र अतिशय छोटी आहे. त्याचा रंग काळा/राखाडी आहे. आणि हे एवढा वर्णन करून देखील ते पुरेशे नाही.
आता आपण हत्ती च्या जागी शिक्षण प्रक्रियेचा विचार केला जरी आपण अंध व्यक्ती नसलो तरी शिक्षण प्रक्रियेचा आपल्याला जसा अनुभव आला त्यावरून शिक्षण प्रक्रिया कशी आहे याचा अंदाज बांधतो. आणि शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून त्या प्रकारच्या अपेक्षा ठेवतो. एखादया रियालिटी शो मध्ये एखाद्या मुलाला अंकगणित गतीशीलपणे करताना आपण पाहतो आणि आपल्या पाल्याकडून तशी अपेक्षा ठेवतो, दुसऱ्या ठिकाणी एखादा मुलगा/मुलगी छान नाचताना पाहिलं की आपल्या पाल्याकडून तशी अपेक्षा ठेवतो, आपल्या शेजारील एखादा विद्यार्थी मेडिकल ला गेला तर लगेच आपल्या पाल्याची तुलना त्याच्याशी केली जाते. अर्थात हे सर्व साहजिक आहे. परंतु जर शिक्षण प्रक्रिया परिपुर्णपणे समजून घेतली तर मात्र आपल्या पाल्याविषयी आपल्या अपेक्षा ह्या स्थळ, काळ, परिस्थिती परत्वे बदलणार नाही त्या त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशा असतील. आणि नक्कीच आपण शिक्षण नावाच्या पूर्ण हत्तीचे डोळसपणे वर्णन करू शकाल. या शिक्षण नावाच्या हत्तीचे सुयोग्य वर्णन करण्यासाठी त्याला समजुन घ्यावे लागेल आणि तो समजल्यावर तुम्ही वर्णन केलेल्या हत्तीचे हुबेहूब चित्र काढून देणार शिक्षक नावाचा चित्रकार शोधनेही तुम्हाला सहज सोपे जाईल, हे मात्र मी तुम्हाला खात्रीने सांगतो. चला तर मग समजून घेऊया शिक्षण प्रक्रिया....
शिकलेल्या व न शिकलेल्या अशा दोन्ही पालकांना शिक्षण प्रक्रिया कशी चालते हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण जर आपल्याला शिक्षण प्रक्रिया कशी चालते हेच माहीत नसेल तर मग आपले पाल्य योग्य प्रकारे शिक्षण घेत आहे की नाही? हे आपणास कळणार नाही. शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू हा नव्या प्रवाहानुसार विद्यार्थी हा आहे. 2021 च्या NEP नुसार वयाच्या 9 व्या वर्षा पर्यंत म्हणजेच वर्ग 3 रा पर्यंत विद्यार्थ्यांना समाजपूर्वक लेखन वाचन व अंकओळख आणि चार गणितीय क्रिया याव्यात ही अपेक्षा ठेवली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण याला प्राथमिक शाळेला जोडण्यास देखील मान्यता दिली आहे. हे होण्यासाठी शाळा व शिक्षक यांनी अभ्यासक्रमानुसार तो समजून घेण्यासाठी आत्मसात करून घेण्यासाठी साधने उपलब्ध करून द्यायची आहेत, तो ज्या ठिकाणी अडखळेल तिथं त्याला मदत करायची आहे. आणि त्याने त्याचे क्षमते नुसार त्याचा वेळ घेऊन तो आत्मसात करायचा आहे. अर्थात घरी शाळा व शिक्षकाचे काम हे पालकांनी करायचं आहे. त्यानंतर मात्र प्राथमिक शिक्षण त्याने त्याच्या कलानुसार सर्व विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, त्यांनां समजतील अशा प्रकारे त्यांना मूलभूत संकल्पना आत्मसात करून घेण्यास मदत करणे. गणित सारख्या विषयाच्या सरावासाठी आवश्यक ती योग्य कृती आधारित सरावासाठी साधने उपलब्ध करून देणे. अशी परिस्थिती निर्माण करणे. विज्ञान सारखा विषय प्रयोगातून तर भाषेसारखा विषय भाषेविषयी वेगवेगळे उपक्रम राबविवुन प्रत्यक्षात भाषा वापरण्याच्या संधी उपलब्ध करून देऊन आत्मसात करून घेण्यास मदत करणे. ज्ञानरचनावाद/अक्टिव्हिटी बेस लर्निंग(कृतियुक्त शिक्षण)/ एकविसाव्या शतकातील कौशल्य/ नवीन तंत्रज्ञानाचा वापर व ह्या सर्व नवीन व जुन्या शिक्षण पद्धतीचा सूयोग्य संगम असलेली शिक्षण प्रणाली ज्या ठिकाणी उपलब्ध होईल असे ठिकाण म्हणजे शाळा असावी. प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे हे शिक्षण व्यवस्थेनं मान्य केलं आहेच, तसंच ते शिक्षण व्यवस्थेत असलेल्या प्रत्येक घटकाने व विद्यार्थी पालकाने देखील मान्य केले पाहिजे किंबहुना हे समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे हे त्यापेक्षाही गरजेचे आहे असे मला वाटते.
वरील सर्व गोष्टी वाचल्यावर जर आपण गोंधळून गेला असाल तर आपणास विनंती आहे की आपण ते पुन्हा एकदा लक्षपूर्वक वाचावे. अर्थात ह्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार का? हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल किंवा अशी शाळा किती महागडी असेल? असा देखील विचार तुमच्या मनात डोकावला असेल परंतु हे पहातांना एक प्राधान्यक्रम आपल्यासाठी तयार करून देण्याचा प्रयत्न करतो.
सर्वप्रथम हे सर्व सुज्ञ पालक म्हणून आपण समजून घेणे आवश्यक आहे. यानंतर ज्या शाळेत ही समज असलेला शिक्षक कोणत्या शाळेत आहे? हे शोधावे म्हणजे तुमच्या लक्ष्यात आलं असेल की सर्वप्रथम आपण का समजून घ्यावे? कारण आपल्यालाच हे समजले नाही तर आपण इतर यासाठी आवश्यक गोष्टी ह्या योग्यच आहे हे आपल्याला कसे समजणार? म्हणून सर्वप्रथम आपण. त्यानंतर ही समज असलेला शिक्षक वर्ग यासाठी की कितीही साधने उपलब्ध असतील परंतु ही समज असलेला निपुण शिक्षक उपलब्ध नसेल तर साधनाचा काही उपयोग नाही. जर समज असलेला शिक्षक वर्ग असेल तर कमी साधनांचा वापर देखील सुयोग्य पद्धतीने ते करतील. म्हणून दोन नंबर ला समज असलेला शिक्षक. आज अनेक जिल्हा परिषद शाळेत असलेल्या शिक्षकांनी हे सिद्द करून दाखवले आहे. कमी साधनांचा सुयोग्य वापर करून विद्यार्थी गुणवत्ता विकास त्यांनी साधला आहे. यानंतर शाळेत असलेली शिक्षणासाठी ऊपलब्ध साधणे त्यामध्ये प्रत्येक विषया साठी स्वतंत्र कक्ष/प्रयोगशाळा सुसज्ज इमारत, प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मैदान व क्रीडा साहीत्य, संगीत कक्ष व वाद्य, कला कक्ष व साधने ह्या व इतर सर्व गोष्टी उपलब्ध असूनही विद्यार्थी कोणत्या शाळेत रमतो हे देखील पाहावे लागेल.. म्हणून प्राधान्य क्रम पुढील प्रमाणे..
१)स्वतः पालकाने शिक्षण प्रक्रिया समजून घेणे..
२)शिक्षण प्रक्रियेची योग्य समज असलेला त्याप्रमाणे शिक्षण प्रक्रिया राबविनारा शिक्षक वर्ग आणि व्यवस्थापन.
३) शाळेत उपलब्ध असलेली सर्व प्रकारची भौतिक साधणे.
४)शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम..
५)शाळेत शिकविण्याचे माध्यम.(मातृभाषा असावे माझे मत.)
हे सर्व सिद्ध करून दाखविणारी शाळा मी पहिली आहे. शाळा ही फक्त दोन शिक्षक असलेली शाळा ज्या ठिकाणी फक्त दोन वर्ग खोल्या, कमी साधणे, परंतु वर उल्लेख केलेली समज असलेले ते दोन शिक्षक. 50 ते 60 विद्यार्थी ज्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि प्रत्येक जण समाजपूर्वक लेखन वाचन करणारा गणितीय अब्ज पर्यंत अंक ओळख असलेले. व त्यावर समजपुर्वक सर्व गणितीय क्रिया करणारे विद्यार्थी. अगदी अस्खलित इंग्रजी भाषेत संवाद साधत होते. अर्थात शाळा मराठी माध्यमाची होती. आणि आजचे पालक शाळेत असलेल्या साधनांवरून शाळेचा दर्ज ठरवतो याबद्दल मात्र मनात दुःख आहेच.
म्हणून वरील तीन गोष्टी तिन्हीचा शोध घेऊया परंतु त्यातील 2री गोष्ट माझ्या मते शाळेत असावीच असा माझा आग्रह राहील..
धन्यवाद!
अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी नक्कीच google सर्च करा.. www.pradipjadhao.com
विडिओ साठी भेट द्या
https://youtube.com/c/pradipjadhao
या Youtube चॅनेल ला..
6 Comments
It is Informative👍
ReplyDeleteThank you🙏
DeleteNice 👌👌👍
DeleteThank you🙏
Deleteछान
ReplyDeleteThank you🙏
Delete