निवृत्तीवेतिधारका साठी कायमस्वरुपी ओळखपत्र-
शासन आदेश
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात ये जा करण्यासाठी, सेवानिवृत्ती बाबतची किंवा निवृत्ती वेतनाबाबत ची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, शासकीय रुग्णालयात औषध उपचार, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँक इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी. तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी ओळख पत्र देण्याबाबत दिनांक 23 फेब्रुवारी 2017 च्या परिपत्रकांवय सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.सदर ओळख पत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सबब सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे साठी नमुना विहित करण्यात आला आहे तो आपल्याला खालील फोटोमध्ये मिळेल.
तरी सर्व प्रशासकीय कार्यालय विभाग यांना सुचित करण्यात येते की सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना ओळख पत्र देण्यात यावे.ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्यासह मोहोर उमटवावी अशी सूचना सदर शासन शासन निर्णयात करण्यात आली आहे तरी सर्व निवृत्त अधिकारी कर्मचारी यांना माहिती मिळावी यासाठी आपण येथे हा शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात देखील उपलब्ध करून देत आहे.
सदर शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करावे
वरील डाउनलोड वर क्लिक करून हा शासन निर्णय आपण पीडीएफ स्वरूपात देखील आपल्याकडे जतन करून ठेवू शकता. धन्यवाद!
अशाच प्रकारची महत्वाचे अधिकारी व कर्मचारी कर्मचारी यांचे संदर्भातील शासन आदेश निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा www.pradipjadhao.com ला..
शैक्षणिक व्हिडीओ साठी भेट द्या आमच्या पुढील यूट्यूब चैनल ला..
3 Comments
सर.फक्त नमुना पी डी एफ टाका कृपया.
ReplyDeleteमला Whatsapp वर् hi करा.
Deleteहे ओळखपत्र कोणत्या पण शासकीय कार्यालयात मिळेल का जेथेतून सेवानिवृत्त झालो त्या कार्यालयात मिळेल
ReplyDelete