राष्ट्रीय विज्ञान दिवस 2022 साजरा करणे बाबत परिपत्रक

 राष्ट्रीय विज्ञान दिवस 2022 साजरा करणे बाबत परिपत्रक.. 


सी. व्ही. रमण हे भारतीय शास्त्रज्ञ ज्यांनी रमन इफेक्ट नावाचा शोध लावला आणि त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांना मानाचा नोबल पुरस्कार देण्यात आला याची आठवण म्हणून दर वर्षी 28 फेब्रुवारी रोजी सर सी व्ही रमण यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो यावर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय विज्ञान दिवस 2022 साजरा करण्यासाठी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान एकात्मिक दृष्टिकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात संबंधी माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे. या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तर निहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने 21 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत घेण्यात यावे शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक यांच्यासाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा किंवा कार्यक्रमाचा दोन-तीन मिनिटाचा सुस्पष्ट व्हिडिओ फोटो व इतर साहित्य फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इत्यादी समाज संपर्क माध्यमांवर #सायन्सडे2018 #नॅशनलसायन्सडे2022 चा वापर करून अपलोड करावी व सदर पोस्ट महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट कार्यक्रमास राज्य स्तरावर प्रसिद्धी देण्यात येईल असे एका परिपत्रकाद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी सांगितले आहे.

कोणत्या येतील विद्यार्थ्यांनी कोणता उपक्रम राबवावा हा तक्ता आपणा साठी खाली उपलब्ध करून देण्यात येत आहे.




सदर उपक्रमाचे आयोजन करताना covid-19 च्या प्रादुर्भावाची च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी राज्यातील सर्व माध्यमांचा आणि सर्व व्यवस्थापन नानांच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षक यांनी वरील नमूद करण्यात आलेल्या ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी शाळा शिक्षक पालक यांना अवगत करण्यात यावी अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक या यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना विभागीय उपसंचालक, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व जिल्हे, शिक्षण उपनिरीक्षक मुंबई, प्रशासन अधिकारी सर्व महानगरपालिका व नगरपालिका प्रशासन अधिकारी सर्व नगरपरिषद या सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे.

सदर परिपत्रक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली वर Download क्लिक करा.. 


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.