जागतिक मातृभाषा दिवस
मातृभाषा म्हणजे आपल्या आईची भाषा जेवढी प्रत्येक बालकाला आई प्रिय असते तेवढीच प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईची भाषा देखील जवळची असते मातृभाषेतून बोललेल वाचलेलं ऐकलेलं हे लगेच समजते लक्षात राहते हे तर आहेच परंतु मातृभाषा ही प्रत्येकाच्या विचार करण्याची भाषा असते त्यामुळे मातृभाषेचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनन्यसाधारण असं आहे म्हणूनच जागतिक स्तरावर 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो..
शिक्षणाच्या संदर्भात मातृभाषेचा विचार जर केला तर शिक्षण घेण्यासाठी किंवा शिक्षणाला सुरुवात करण्यासाठी मातृभाषे शिवाय दुसरे कोणतेही प्रभावी साधन किंवा भाषा आजही उपलब्ध नाही म्हणून जपान सिंगापूर मलेशिया या सारख्या प्रगत राष्ट्रात आजही मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिलं जातं. म्हणून शिक्षणाच्या दृष्टिकोनातूनही मातृभाषा ही महत्त्वाची आहे..
जागतिक मातृभाषा दिवस सासरा करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी एका परिपत्रकाद्वारे मातृभाषेच्या प्रचार आणि प्रसारास चालना मिळावी या दृष्टीने तसेच विश्वातील अनेक भाषा सांस्कृतिक परंपरा यांच्याप्रती जागरुकत निर्माण व्हावी यासाठी 21 फेब्रुवारी हा दिवस हिस कोणी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे उपरोक्त उद्दिष्टांच्या अनुषंगाने सदर दिवस खालील उद्देशाने साजरा करण्यात यावा असे म्हटले आहे.
देशातील भाषिक विविधतेवर प्रकाश टाकणे. मातृभाषे बरोबर अन्य भारतीय भाषांच्या वापराबाबत प्रोत्साहन देणे. भारतातील सांस्कृतिक विविधता साहित्य शिल्प प्रदर्शन विविध रचनात्मक अभिव्यक्ती अशा बाबींना समजावून देणे व त्या प्रती लक्ष वेधणे. आपल्या मातृभाषेत बरोबरच अन्य भाषा शिकण्यास प्रेरित करणे.
उपरोक्त शैक्षणिक उद्दिष्टपूर्तीसाठी खालील प्रमाणे उपक्रमांचे आयोजन करावे. वकृत्वस्पर्धा, रंगकाम, समूहगीत लोकगीतांचे गायन, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, भारतीय भाषांवर आधारित हिंदी पत्रके पोस्टर यामाध्यमातून प्रदर्शन भरवणे, नाट्यीकरण, इतर संबंधित उपक्रम..
सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर दिवस वाचन अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाच्या अनुषंगाने सदर दिवसाच्या औचित्याने एन सी आर टी नॅशनल ट्रस्ट स्टोरी विवर प्रथम बुक्स रूम टू रीड क्लाऊड यासारख्या स्त्रोतांचा वापर मुलांना वाचनास प्रवृत्त करण्या करता येऊ शकतो या दिवसाच्या निमित्ताने वाचन अभियानातील आठवा क्रमांक 13 मध्ये असलेला उपक्रम व त्या आठवड्यात घेण्यात यावा उपरोक्त सूचनांप्रमाणे कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडे पाठवायचा आहे सदर अहवालाच्या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करून याबाबतची जिल्ह्याची माहिती एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या लिंक वर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमात या नोट अधिकाऱ्यांमार्फत धरण्यात यावे असे निर्देश सहसंचालक रमाकांत कोठमारे सहसंचालक यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे..
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
0 Comments