विद्यार्थ्यांचा पालक म्हणून आपल्या समोरील आव्हाने
आणि त्यावरील उपाय...
जसे जसे जीवनमान बदलत आहे तसेच आजच्या विद्यार्थ्यांच्या गरजा देखील बदलत आहे आणि या विद्यार्थ्यांची पालक म्हणून आपली भूमिका कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देखील बदलत आहे. जसे आपण विद्यार्थ्यांकडून अपेक्षा ठेवतो त्या प्रमाणात आपली काही कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांचा पालक म्हणून आपल्या समोरील आव्हाने आपण ओळखणे, त्याला सामोरे जाणे आणि त्यावर उपाययोजना करणे. तर विचार करुया सविस्तर पणे आजच्या विद्यार्थ्यांचा पालक म्हणून आपल्या समोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय यांचा देखील..
मुलांच्या शारीरिक गरजा पूर्ण करणे.. .
मुलांच्या बौद्धिक गरजा पूर्ण करणे..
आपल्या मुलांसाठी शाळा निवडणे, अभ्यासक्रम निवडणे, माध्यम निवडणे..
मुलांना आवश्यक अशी शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे..
मुलांच्या शारीरिक बौद्धिक गरजा सोबतच त्याच्या मानसिक गरजांकडे देखील लक्ष देणे..
मुलांची जमेची बाजू ओळखून त्यानुसार त्याला व्यवसायिक दृष्टीने सक्षम करणे..
नियमित अभ्यास घेणे त्याची मित्र-मैत्रिणी कोण आहे याच्याकडे लक्ष ठेवणे..
मुलांच्या वर्तणूकी कडे लक्ष ठेवून तो/ती योग्य वर्तणूक करतो आहे की नाही हे काळजीपूर्वक पाहणे आणि त्याला योग्य वळण लावणे..
मुलांच्या शारीरिक गरजा पूर्ण करणे.. .
विविद्यार्थ्यांच्या योग्य वाढ व विकासासाठी त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. यामध्ये त्याला संपूर्ण पोस्टीक आहार मिळणे, त्याला व्यायामाच्या सवयी लावणे, त्याला किंवा तिला स्वच्छतेच्या योग्य त्या सवयी लावणे, अतिशय सकस असा योग्य तो आहार उपलब्ध करून देणे, तो किँवा ती वाईट सवयींपासून दूर कसा राहील याकडे लक्ष देणे जर त्याला काही शारीरिक त्रास होत असेल तर योग्य वेळी डॉक्टरांना दाखवून त्यावर औषध उपचार करणे.
बऱ्याच वेळा आजकालच्या संकरित वाना पासून तयार झालेले जेवण विद्यार्थ्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाही यासाठी त्यांना आवश्यक पूरक आहार उपलब्ध करून देणे.
योग्य वेळी योग्य गोष्टी करण्याच्या सवयी त्यांच्या अंगी बाणवणे जसे की रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे वेळेचे काम वेळेवर करणे इत्यादी..
उपाय..
शारीरिक विकासासाठी पूरक आहार म्हणून बाजारातील उत्पादन घेण्यापेक्षा काही नैसर्गिक गोष्टी ऑरगॅनिक फूड उपलब्ध होत असेल तर त्याचा वापर आपण विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी करू शकतो.
चांगल्या सवयी जसे की व्यायाम करणे, वेळेवर ची कामे वेळेवर करणे, सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपने...अश्या आरोग्यदायी सवयी आपण उदाहरण म्हणून विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्यासोबत करू शकतो. म्हणजेच ते आपल्याला आदर्श मानतील आणि ते देखील तशा चांगल्या सवयी त्यांच्या अंगी बाळगतील आणि आपण देखील त्यांना नैतिक दृष्ट्या ह्या सवयी बाळगण्यास सांगण्यास पात्र ठरू शकतो..
याव्यतिरिक्त वेळच्यावेळी औषधोपचार करणे हे आपण नियमित करतोच.. असे इतरही उपाय आपण करू शकतो..
मुलांच्या बौद्धिक गरजा पूर्ण करणे..
आपली मुले काही अंगभूत क्षमता घेवून जन्माला आली आहेत हे आपण समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यांच्या या क्षमता मुळे ते मी बोलत असलेल्या जवळपास सर्व गोष्टी ह्या कुठल्यातरी तर्कावर आधारित असतात म्हणजेच निष्फळ किंवा वायफळ नसतात. म्हणून त्यांचे म्हणणे ऐकून आणि समजून घेणे महत्त्वाचे असते जर आपण अनेक वेळा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तर आपण जो विचार करतो आपण जे बोलतो ते काही महत्त्वाचे नाही किंवा विनाकारण आहे असा न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्या घरातील मुलांना वागवणे म्हणजेच त्यांच्या बौद्धिक गरजा पूर्ण करणे हे देखील मोठे आव्हान या धावपळीच्या युगात पालकांच्या समोर आहे कारण मुलांना देण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ देखील नाही आणि पुरेसा वेळ नसल्यामुळे आपण त्यांच्या बौद्धिक गरजा स्वतः पूर्ण करू शकत नाही आणि आपण इतर उपाय शोधतो परंतु ते उपाय पुरेसे ठरत नाही.
विद्यार्थी किंवा आपल्या घरातील मुले आपल्याला नेहमी कुठले ना कुठले प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरे त्यांना हवी असतात आणि या उत्तराने त्यांचे समाधान झाले पाहिजे हेही गरजेचे असते. जर त्यांच्या प्रत्येक क्षमतेची वाढ व विकास आपल्याला घडवून आणायचा आहे, तर त्यांच्या या चिकित्सक वृत्तीला खत पाणी देणे आणि त्यांना प्रश्न विचारण्यास आणि त्याचे समाधान शोधण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
उपाय..
आपल्या घरातील मुलांना पालक म्हणून पुरेसा वेळ देऊन त्यांना समजून घेणे गरजेचे ठरते त्यांना समजून घेतल्यानंतर त्यांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे म्हणजे त्यांची बौद्धिक भूक भागेल यासंदर्भात निखिल उपाय योजना करणे गरजेचे आहे. घरात निर्णय घेताना मुलांची मत घेणे आणि त्याचा योग्य तो मान राखणे हे देखील गरजेचे आहे. त्यांच्या क्षमतेनुसार ते योग्य विचार करतात हे त्यांच्या लक्षात आणून देणे जर एखादा त्यांचा विचार परिस्थिती नुसार लागू होत नसेल तर ते त्यांना पटवून देणे देखील गरजेचे आहे.
मुलांची चिकित्सक वृत्ती वृद्धिंगत होण्यासाठी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांना त्यांचे समाधान होईपर्यंत उत्तर द्यावे लागेल जर आपणास त्यांच्या शंकांचे समाधान करण्यापुरती ज्ञान नसेल तर ते ज्ञान कोणत्यातरी माध्यमातून मिळवून त्यांना पुराव्यासह ते पटवून देणे गरजेचे आहे. योग्य वयात त्यांना तज्ञ व्यक्तींची भेट घडवून किंवा आजच्या इंटरनेटच्या युगात नेमक्या कोणत्या संकेतस्थळाला भेट दिल्यास त्याच्या शंकांचे समाधान अधिक चांगल्या पद्धतीने होईल हे त्याला योग्य शब्दात समजून सांगणे गरजेचे आहे म्हणजेत यामुळे त्याच्या लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक विषयातील तज्ञ नसतो तर वेगवेगळ्या विषयात वेगवेगळे व्यक्ती निष्णात असतात आणि आपल्या आवडीचा विषय आपल्याला शिकायचा असेल तर कशा निष्णात व्यक्तीकडे जाऊन तो विशेष होऊ शकतो किंवा योग्य माहिती असलेल्या संकेत स्थळावर जाऊन आपण स्वयं अध्ययन करू शकतो.
आपल्या मुलांसाठी शाळा निवडणे, अभ्यासक्रम निवडणे, माध्यम निवडणे..
यावर आपल्या ब्लॉग वर आपण या अगोदर चर्चा केली आहे जर आपण ते आर्टिकल वाचलेले नसतील तर..
शाळेचे माध्यम कोणते असावे यासाठी
शाळा निवडीचे निकष यासाठी..
अभ्यासक्रम निवडीसाठी प्रत्येक अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेला असतो तो आपण विद्यार्थ्यांना आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार किंवा विद्यार्थ्यांच्या कलानुसार निवडावा अमुक एक अभ्यासक्रम निवडला म्हणजेच मुले खूप चांगली शिकू शकतात हा आपला ग्रह काही गोष्टींवरून तयार झालेला आहे त्या गोष्टींवर तो अवलंबून आहे. अभ्यासक्रम आपण कोणताही निवडू शकतो परंतु तो द्यार्थ्यांच्या अंगभूत कुवतीनुसार किंवा क्षमतेनुसार असावा आपण येथे नेमका हाच अभ्यासक्रम निवडावा असे आपणास निश्चित असे सांगू शकत नाही.
मुलांना आवश्यक अशी शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे..
मुलांना आवश्यक अशी शैक्षणिक साधने उपलब्ध करूनही देणे म्हणजे मुलांना महागडी शैक्षणिक साधने असा याचा अर्थ होत नाही तर मुलांना शिकण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साधने तिच्या साधनांद्वारे मुले सहज शिकती होतील अशी शैक्षणिक साधने त्यांना उपलब्ध करून देणे मग ती कमीत कमी खर्चात स्वतः हाताने बनवलेली किंवा निरुपयोगी वस्तू पासून बनवली जाणारी शैक्षणिक साधने असू शकतात.. निसर्गात निसर्गतः उपलब्ध असणारी साधने असू शकतात किंवा बाजारातून खरेदी केले आले की एखादी गोष्ट हेतुपुरस्सर शिकवण्यासाठी तयार केलेले साहित्य असू शकते आता यापैकी कोणते साहित्य आपल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे आणि आपण ते खरेदी करून किंवा उपलब्ध करून देऊ शकतो याचा विचारपूर्वक निर्णय घेऊन पालकांनी ती उपलब्ध करून द्यावी लागतात आता ही उद्दिष्टानुसार साहित्य मिळवणे किंवा तयार करणे हे देखील एक पालका समोरील आव्हान आहे.
या साधनांमध्ये पाठ्यपुस्तके पेन पेन्सिल आणि इतर ज्या गोष्टी शिक्षण घेण्यासाठी आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट होतात.
उपाय..
शैक्षणिक साधने निवडतांन विद्यार्थ्यांचा वयोगट व त्यांची गरज पालकांना परवडतील अशी साधने पालक उपलब्ध करून देऊ शकतात. ही साधने अनेक विद्यार्थ्यांसाठी एक देखील वापरात येऊ शकतात. म्हणजे काही साधनांचा वापर नियमित प्रत्येक विद्यार्थ्याला करावा लागत नाही तो कधी कधीच करावा लागतो यासाठी ती गटात जर उपलब्ध झाली तरी हरकत नाही याचा देखील विचार पालकांनी करायला हवा कारण एखादी कौशल्ये एकदा उघड झाले त्याचा सराव पूर्ण झाला तर ही साधने विद्यार्थ्यांसाठी निरूपयोगी ठरतात अशावेळी ते साधन इतर विद्यार्थ्यांच्या उपयोगी देखील ठरू शकते याचा विचार करून ती साधने वापरावी किंवा खरेदी करावी..
काही साधने जर शाळेत उपलब्ध असतील तर शाळांनी विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देऊन त्यांना ती वापरण्याची संधी दिली तर याचा भार पालकांवर पडणार नाही. अशा वेळी पालकांनी शाळेशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
मुलांच्या शारीरिक बौद्धिक गरजा सोबतच त्याच्या मानसिक गरजांकडे देखील लक्ष देणे..
विद्यार्थ्यांची मानसिकता देखील शिक्षणावर परिणाम करते ही गोष्ट लक्षात त्यांची मानसिकता शिक्षणासाठी कशी टिकून राहील याबद्दल विचार करणे देखील पालकासमोर एक आव्हानच आहे. मग त्याची मानसिकता टिकून ठेवण्यासाठी घरातील वातावरण, त्याचे मित्र, परिसरातील व्यक्ती, घरातील व्यक्ती या सर्वांकडून काही गोष्टी घडणे अपेक्षित आहे. याचे नियंत्रण पालकांकडून होणे अपेक्षित आहे आणि हे नियंत्रण ठेवणे देखील पालकांसाठी एक आव्हानच आहे. पालकांचा विद्यार्थ्यांसमोर असलेला सुसंवाद यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतो.
उपाय..
यासाठी आई आणि वडील दोघांनी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले किंवा जोपासले तर ते त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट आपल्या आईवडिलांची ना सांगतील व त्यांची मानसिक स्थिती नियमितपणे आई-वडिलांच्या लक्षात येत आहे आणि एक प्रकारचा विश्वास हा एकमेकांना टिकून राहील जर मुले एककल्ली झाली एकलकोंडी झाली तर ती कशी खुलेपणाने बोलतील याकडे पालकांनी लक्ष देणे यावरचा उपाय आहे. जर हे पालकांकडून शक्य होत नसेल तर अशा वेळी मानसोपचार तज्ञांची मदत घेणे योग्य ठरेल..
मुलांची जमेची बाजू ओळखून त्यानुसार त्याला व्यवसायिक दृष्टीने सक्षम करणे..
जर एखादा वडिलोपार्जित व्यवसाय आपण करत असतो किंवा आपले कुटुंब करत असेल तर त्या व्यवसायात विद्यार्थी जन्मापासून असून सहभागी असतो आणि त्याला त्याबद्दल बरीचशी माहिती आलेली असते अशावेळी आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाशी संबंधित शिक्षण विद्यार्थ्याने घ्यावे अशी अपेक्षा पालक करतात परंतु काही विद्यार्थ्यांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यामधील कौशल्य त्याला आत्मसात होऊ शकत नाही त्यामुळे त्यामध्ये असलेली कौशल्य किंवा अंगभूत क्षमता कोणत्या व्यवसायासाठी उपयोगी ठरतील हे शोधणे पालकांसाठी एक आव्हान आहे आणि त्यासोबतच कोणत्या व्यवसायिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना टाकावे हे समजून घेणे देखील पालकांसमोर एक आव्हान आहे..
उपाय..
विद्यार्थ्यांना नेमकी कोणत्या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून द्यावा किंवा कोणता व्यवस्थित अभ्यासक्रम निवडावा यासाठी कलचाचणी उपलब्ध आहेत ह्या कलचाचणी लिखित स्वरुपाच्या प्रात्यक्षिक स्वरूपाच्या आणि मुलाखत स्वरूपा च्या देखील असतात अशा वेळी योग्य तज्ञ व्यक्ती अथवा संस्थेकडून आपल्या मुलांच्या आपण करून घेऊ शकतो किंवा त्याचे स्वतःचे काय इंटरेस्ट आहे यावरून देखील आपल्याला कळत अशावेळी आपण जास्त अट्टहास न करता योग्य तो निर्णय घ्यावा..
नियमित अभ्यास घेणे त्याची मित्र-मैत्रिणी कोण आहे याच्याकडे लक्ष ठेवणे..
शाळेत तुन मुलांना दिलेला अभ्यास घरी करून घेणे हीदेखील जबाबदारी पालकांकडे असते अशावेळी विद्यार्थ्याला पुरेसा वेळ देऊन त्याला जो अभ्यास करायचा आहे ही संकल्पना योग्य पद्धतीने समजली आहे की नाही हे देखील समजून घेऊन त्याचा अभ्यास पूर्ण करण्यामध्ये त्याला मदत करणे त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत याच्या कडे लक्ष ठेवून त्याच्या वागणुकी कडे लक्ष ठेवणे हे देखील पालकांना समोरील आव्हाने आहेत..
उपाय..
विद्यार्थी अभ्यास करताना त्यांचे एक लक्ष ठेवणे त्यांनी अभ्यास पूर्ण केला की नाही केला हे विचारणे आणि जर केला नसेल तर त्याला काही अडचण आहे का ती अडचण आपण सोडवणे हा त्यावरील उपाय ठरेल. मुले कोणा सोबत राहतात कुणासोबत खेळतात कोणाच्या घरी जातात याकडे लक्ष ठेवणे ही त्यावर उपाय आहे त्यांच्या काही सवयी बदलल्या आहेत का? त्या कशामुळे बदल्या? त्या चांगल्या स्वरूपात बदलले की वाईट स्वरुपात बदलले आहे? याकडे जर आपण लक्ष ठेवले तर आपण त्यावर वेळीच उपाय करू शकतो.
मुलांच्या वर्तणूकी कडे लक्ष ठेवून तो/ती योग्य वर्तणूक करतो आहे की नाही हे काळजीपूर्वक पाहणे आणि त्याला योग्य वळण लावणे..
विद्यार्थ्यांची वागणूक चांगली कशी राहील ती त्यांची वर्तणूक बिघडणार नाही याकडे लक्ष ठेवणे हे पालकासमोर आव्हान आहे कारण विद्यार्थी मोठ्या शाळेत शिकतो मोठ्या शाळेतील कोणते विद्यार्थ्यांशी त्याचा रोज संपर्क येतो शाळेत तू कोणत्या मुलांसोबत राहतो हे पालकांना बहुतांश वेळा माहीत नसते. मग त्यांच्या वर्तणुकीतील बदल चांगला असेल तर ठीक परंतु वाईट बदल जर घडत असतील तर त्याचा छडा लावणे हे पालकांसमोर ची मोठे आव्हान होऊन बसते..
विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात टीव्ही मोबाईल मध्ये जसे पाहतात तसे ती करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावर नियंत्रण हे पालकाचे असत नाही शा वेळी बर्याच अडचणी निर्माण होतात आणि योग्य वळण लावणे हे पालकांसाठी आव्हान होऊन बसते.
उपाय..
शाळेतील शिक्षकांची योग्य संवाद राखून मुले कोणा सोबत राहतात खेळतात त्यांचे सोबती कोण आहेत याची माहिती पालक सहज ठेवू शकतात आणि त्यांची वागणूक नियंत्रित करु शकतात..
जेव्हा विद्यार्थी टीव्ही पाहतात मोबाईल वापरतात अशावेळी घरातील एखादी सुज्ञ व्यक्ती त्यांच्या सोबत असावी म्हणजे ती काय करतात त्याचे नियंत्रण करणे सोपे जाईल आणि त्यांना वळण लावणे सोपे जाईल..
अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या शैक्षणिक समस्या आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
0 Comments