आजच्या नवीन पिढीचा शिक्षक म्हणून शिक्षका समोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय

 आजच्या नवीन पिढीचा शिक्षक म्हणून 

शिक्षका समोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय!! 


आत्ताचा शिक्षक खडू फळा यांच्या पुरता मर्यादित राहिला नसून अनेक नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रात येत आहे.  या संकल्पना राबवण्यासाठी शिक्षका समोरील आव्हाने देखील वाढलेली आहेत. जसजसे जग बदलत आहे तसतशी शिक्षकांची भूमिका देखील बदलत आहे. चला विचार करूया आजच्या पिढीचा शिक्षक म्हणून शिक्षकां समोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय याचा.. 

नवीन तंत्रज्ञान शिक्षणामध्ये वापरण्याचे आव्हान.. 

शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना समजून त्या वापरण्याचे आव्हान.. 

बदलत्या आधुनिक पिढीला त्यांना आवश्यक अशा पद्धतीने शिक्षण देण्याचे आव्हान.. 

बदलत्या काळासोबत स्वतःला अद्यावत ठेवण्याचे आव्हान.. 

स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे आव्हान.... 

शिक्षण क्षेत्रातील वेळेचे नियोजन करण्याचे आव्हान.. 

स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचे आव्हान.. 



नवीन तंत्रज्ञान शिक्षणामध्ये वापरण्याचे आव्हान..

खडू फ़ळा आणि पुस्तक एवढच शिक्षकाचे क्षेत्र मर्यादित राहिले नाही तर यापलिकडे जाऊन शिक्षकाला कराव्या लागतात.

त्यामधे बऱ्याच शाळेत स्मार्ट बोर्ड, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सराईतपणे वापर आजच्या शैक्षणिक प्रक्रियेत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे म्हणून त्यांना शिकून घेणे आणि त्या गोष्टींचा टेक्निकल नॉलेज मिळवून त्या या गोष्टी अध्ययन अध्यापनात योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरणे हे आजच्या शिक्षकांना समोरील एक नवे आव्हान आहे.

आजची विद्यार्थीदेखील या सर्व व इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी सराईतपणे वापरतात आणि त्यांना स्वयंअध्ययन करताना यासंबंधीची आलेली अडचण ते पालक किंवा शिक्षकांना विचारतात अशावेळी शिक्षकांना या त्यांचे ज्ञान असणे आवश्यक ठरते.

याव्यतिरिक्त अध्ययन घटका संदर्भात अधिकची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट आणि ते वापरण्यासाठी लागणारी उपकरणे हे योग्य प्रकारे वापरता आली पाहिजे. पाठ्य घटका सोबत अधिक संदर्भित माहिती गोळा करण्यासाठी देखील ही उपकरणे महत्त्वाची ठरतात विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करताना आलेली अडचण गुगल करून कशी सोडवायची याचे ज्ञान अगोदर शिक्षकाला हवे त्यानंतरच तो विद्यार्थ्यांना सांगू शकतो.

क्यू आर कोड, बारकोड, थ्रीडी ॲनिमेशन, व्हर्च्युअल क्लासरूम ह्या सगळ्या संकल्पना समजण्यासाठी शिक्षकांना यांची ज्ञान आणि वापरासंबंधी ची माहिती असणे आवश्यक आहे.

अध्यापन करताना वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स चा वापर कसा करावा हे समजून घेणे.


उपाय..

यावर उपाय म्हणून आपण या बद्दल माहिती असलेल्या व्यक्तीकडून ही सर्व साधने कशी वापरायची या संदर्भात माहिती मिळवून घ्यावी. सर्व साधने स्वतः वापरून पहावी. 

अध्यापन करताना अध्यापन घटक शिकवताना यापैकी कोणत्या साधनाचा योग्य वापर आपण करू शकतो या संदर्भात नियोजन करावे.

अध्ययन अध्यापन करताना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी गूगल यूट्यूब आणि यासारख्या अनेक गोष्टींचा वापर कसा करता हे स्वतःला पण शिकून घ्यावे.

अध्यापन करताना वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आपल्याला कसे उपयोगी पडतील याबद्दल इतरांकडून किंवा इंटरनेटवरून देखील आपण शिकून घेऊ शकतो.

अर्थात बदलत्या काळासोबत शिक्षकांनीही स्वतःहून डिजिटल व्हावे हा त्यावरील उपाय आहे.


शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना समजून त्या वापरण्याचे आव्हान.. 

शिक्षण क्षेत्रात डिजिटल लर्निंग, ज्ञानरचनावाद, ॲक्टिविटी बेस लर्निंग, आनंददायी शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, कले मधून शिक्षण, संगीतातून शिक्षण अशा वेगवेगळ्या नवनवीन संकल्पनांचा समावेश होत आहे. या सर्व संकल्पना ची पायाभूत ज्ञान शिक्षकाला असणे आवश्यक आहे आणि ह्या निरनिराळ्या संकल्पना समजून घेण्याचे व त्या प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शिकवताना वापरायचे आव्हान आजच्या शिक्षकांपुढे आहे. या निरनिराळ्या संकल्पना विद्यार्थ्यांना अध्यापन करताना वापरताना कोणकोणती साधने मी कोणकोणते साहित्य कशा पद्धतीने वापरायचे हे समजून घेणे देखील शिक्षकांच्या समोरील आव्हानच म्हणावे लागेल.

उपाय

सी पी डी म्हणजेच कंटीन्यूअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट नावाची एक संकल्पना आहे, याचा मराठीत अर्थ अविरत व्यवसायिक विकास असा होईल आणि हे करण्यासाठी शासनाने आयोजित केलेली वेगवेगळे प्रशिक्षण शिक्षकांनी स्वतःहून जर घेतली नियमित जर घेतली तर त्याला ह्या सर्व व नवीन शैक्षणिक संकल्पना समजून घेण्यास मदत होईल याव्यतिरिक्त आपल्या समव्यवसायिक मित्रांशी नियम संपर्कात राहून त्यांच्याशी पुन्हा नवनवीन संकल्पना संदर्भात चर्चा केल्यास ह्या नवनवीन संकल्पना समजून घेणे सहज सोपे होईल. अजूनही अडचण आली तर इंटरनेट आपला सोबती आहेच.


बदलत्या आधुनिक पिढीला त्यांना आवश्यक अशा पद्धतीने शिक्षण देण्याचे आव्हान.. 

बदलत्या काळानुसार विद्यार्थी बदलले आहे आणि त्यानुसारच त्यांच्या गरजा वागणूक देखील बदलली आहे. आणि त्यांच्या गरजांनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा नुसार त्यांना शिक्षण देणे त्यांना अध्यापन करणे ही एक आव्हान शिक्षकांना पुढील महत्त्वाचे आव्हान आहे. 

दोन-तीन दशका अगोदर अशी विद्यार्थी शिक्षकांसमोर होते की ज्यांचे पालक खूप कमी शिकलेले अथवा निरक्षर होते आणि जवळपास विद्यार्थी हे पहिली शिक्षण घेणारी पिढी म्हणून शिक्षकांसमोर बसत होते. परंतु आजच्या घडीला जे विद्यार्थी आपल्या समोर आहेत त्यांची दुसरी काहींची तिसरी पिढी शिक्षण घेत आहे आणि त्यानुसार त्यांच्या घरातील वातावरण देखील आहेत.म्हणजेच त्यांचे आई-वडील आजी आजोबा हे शिक्षित आहे त्यांना काय योग्य काय अयोग्य हे कळते शिक्षकांनी त्यांच्या पाल्याला योग्य त्या पद्धतीने योग्य तेच शिकवलं आहे की नाही याकडे त्यांचे बारीक लक्ष असते आणि त्यानुसार ते वेगवेगळ्या अपेक्षा देखील शिक्षक आणि शाळा यांच्याकडून ठेवतात. 

या सर्व परिस्थितीनुसार विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे देखील एक आव्हान शिक्षकांपुढे आहे.

उपाय...  

योग्य नियोजन पूर्वक अध्यापन केल्यास पालकांच्या एक एक अशा या अपेक्षांची पूर्ती आपण शिक्षक म्हणून करू शकतो. आपल्या वार्षिक नियोजनात वेगवेगळ्या विषयांना योग्य तो वेळ देऊन वेगवेगळे शालेय आणि सहशालेय उपक्रम राबवून पालकांच्या बहुतांश अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो.

अध्यापन करताना आपली भाषा आणि विषयज्ञान यांची पूर्व तयारी करून अचूक असे अध्यापन करणे महत्त्वाचे ठरेल कारण जर घरी शिक्षित असलेल्या पालकांना बऱ्याचशा चुका अनेक वेळा आढळून आल्या तर त्यांचा गैरसमज होऊ शकतो यासाठी शिकवताना काळजीपूर्वक आणि अचूक असे अध्यापन करणे गरजेचे आहे.

विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांना काहीच समजत नाही आपण जे शिकवले तेच ते योग्य मानतील असा आजच्या पिढीतील विद्यार्थी आणि पालकांना संदर्भात गैरसमज करून घेऊ नये याउलट विद्यार्थी व पालकांना सर्व काही समजते आणि म्हणून अध्यापन करताना चुकते बाबत पूर्णपणे काळजी घेऊन अध्यापन करणे महत्वाचे ठरेल.


बदलत्या काळासोबत स्वतःला अद्यावत ठेवण्याचे आव्हान..

काळ रोज बदलत आहे माहिती आणि तंत्रज्ञान यामुळे प्रत्येक जण अपडेट असतो समाज माध्यमे, टीव्ही, न्यूज चॅनल्स ह्या सर्व गोष्टी सर्वांकडे असलेल्या मोबाईल मध्ये सहजगत्या नियमित अपडेट तपासणे सगळ्यांना शक्य आहे त्यामुळे या सर्वांचा वापर करून विद्यार्थी पालक आणि समाज हा स्वतःला अपडेट ठेवतो त्याच प्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला नियमित अपडेट ठेवणे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे आणि हे एक मोठे आव्हान शिक्षकांना पुढील आहेत. कारण ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत आहेत आणि शिकवताना विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की शिक्षकांना ती अद्यावत गोष्ट माहीत नाही अशा वेळी आपली तारांबळ उडते आणि म्हणून बदलत्या काळासोबत स्वतःला अद्ययावत ठेवण्याचे आव्हान शिक्षकांच्या समोर आहे.


उपाय...

ज्याप्रमाणे समाज माहिती आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून समाज माध्यमे टीव्ही न्यूज चॅनल्स या सर्व गोष्टी आवश्यकतेनुसार त्यावरील अपडेट पाहून शिक्षक म्हणून आपण देखील स्वतःला अपडेट ठेवू शकतो आणि जर आपल्याला हे सर्व आपल्याला काही अडचण येत असेल तर ती आपल्या मुलांकडून किंवा आपल्या सहकाऱ्यांकडून समजून घेऊन आपण ते वापरायला शिकून घ्यावे म्हणजे आपण बदलत्या काळासोबत स्वतःला अद्ययावत ठेवण्याची आव्हान सहज पेलू शकू.


स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे आव्हान.... 

विद्यार्थी पालक आणि समाज हा शिक्षकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्यांना आलेली कोणत्याही क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी ते शिक्षकांकडून अपेक्षा बाळगतात आणि या सर्वात काही गैर नाही परंतु शिक्षक म्हणून आपल्याही काही मर्यादा आहेत आपण सर्व क्षेत्रात तरबेज असू शकत नाही परंतु किमान सर्व क्षेत्रातील पायाभूत ज्ञान शिक्षकांकडे असणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच शिक्षकांनी त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची आव्हान शिक्षकांपुढे आहे.


उपाय...

मनुष्य हा जन्मापासून मरेपर्यंत आजन्म विद्यार्थी असतो ही गोष्ट लक्षात ठेवून दररोज नियमितपणे कुठलीतरी एखादी नवीन गोष्ट वाचून पाहून ऐकून शिकून घेणे महत्वाचे ठरेल यासाठी पुस्तक वाचणे बातम्या ऐकणे आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करणे वेगवेगळ्या प्रशिक्षकांना हजेरी लावणे नवीन ज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान आपल्याला कुठून मिळेल अशा प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणे आणि स्वतःचे ज्ञान वाढ होणे आणि नियमित अपडेट करणे हा त्यावरील उपाय ठरेल.


शिक्षण क्षेत्रातील वेळेचे नियोजन करण्याचे आव्हान.. 

शिक्षक हा समाजातील एक सर्वगुणसंपन्न असा घटक आहे असे समाज मानतो णि त्याच्याकडून खूप सार्‍या अपेक्षा समाज आणि व्यवस्था ठेवते या सर्व अपेक्षा शिक्षकाला पूर्ण करायच्या असतात आणि यासाठी अनेक गोष्टी शिक्षकांना करायचे असतात सर्व गोष्टी करताना मर्यादित वेळेत वेगवेगळ्या गोष्टी करणे हे शिक्षकांचे समोरील एक मोठे आव्हान आहे.


उपाय...

सर्व गोष्टी वेळच्या वेळी होण्यासाठी आणि आठवणीत राहण्यासाठी डायरी किंवा आपल्याकडे असलेल्या स्मार्ट फोन मधील कॅलेंडर किंवा नोट्स वर आपण त्यांच्या नोंदी ठेवू शकतो यामुळे आपल्याला वेळेचे नियोजन करणे सोपे जाईल.

जी अनेक कामे आपल्याला करायची आहेत त्यांचा आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रम लावल्यास अत्यावश्यक कामे वेळेवर होण्यास मदत होईल. ज्याप्रमाणे शाळेचे वेळापत्रक असते त्याच प्रमाणे स्वतःची वेळापत्रक जर तयारी केली तर अधिक उपयोगी ठरेल.


स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचे आव्हान.. 

रोज नवनवीन शाळा आपल्या नवनवीन कल्पना घेऊन उभ्या रहात आहे. फक्त डी.एड, बी.एड. केलेली लोकच शिक्षक म्हणून शिकवताना दिसत नाही तर उच्चशिक्षित लोक देखील शिक्षक म्हणून अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम करताना दिसतात. यासोबतच अनेक डी.एड, बी.एड. केलेली लोक आपले ज्ञान अद्ययावत करून वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करून आपली जागा घेण्यास तयार आहेत आणि म्हणून या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचे आवाहन देखील शिक्षकांसमोर आहे.


उपाय...

वर सांगितल्याप्रमाणे स्वतःला नियमित अपडेट ठेवणे, नवनवीन अध्ययन अध्यापन संकल्पना समजून घेणे, वेळेचे योग्य नियोजन करणे नवीन पिढी च्या आव्हानाचा स्वीकार करणे, आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे, स्वतःचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास करून घेणे, पूर्वतयारी करून अध्यापनात अचुकता साधने या सर्व गोष्टी आपण केल्या तर स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचे आव्हान आपण निश्चितपणे पेलू शकतो.


अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या शैक्षणिक समस्या आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

2 Comments

  1. खुपच छान माहिती .खरोखरच शिक्षक बदल स्विकारणे गरजेचे.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.