सरसकट सगळ्या शाळा बंद करणे योग्य की अयोग्य?
कोरोनामुळे बरेच दिवस शाळा बंद झाल्या आणि काही दिवसांपासुन शाळा सुरू करण्यात आल्या होत्या परंतू पुन्हा रुग्नसंख्या वाढू लागली आणि परत शासनाने आदेश निर्गमित करून १ ली ते १२ च्या शाळा १५ फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष बंद राहतील असे सांगितले.
नुकतेच विद्यार्थी शाळेत रमले होते आणि त्यांनी अभ्यासाला चांगली सुरवात केली होती यामुळे पालक शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरळीत सुरू झालं म्हणून सुखावला होता. त्यामुळे शाळा बंद करण्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली सुरवातीला मुंबई पुणे शहरात रुग्ण संख्या अधिक असल्यामुळे तिथल्या शाळा बंद झाल्या. हळूहळू इतर काही जिल्ह्यात देखील शाळा बंद झाल्या. विदर्भात अमरावती जिल्ह्यात शाळा बंद करण्याचा आदेश निघाला आणि बुलडाणा जिल्ह्यातील शाळा कधी बंद होणार? या मथळ्याखाली वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याच दिवशी बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी देखील १ ते ८ च्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. एका दिवसानंतर पुन्हा राज्य सरकारने १ ते १२ सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.
हे होत असताना बऱ्याच जिल्ह्यात खूप कमी रुग्ण संख्या आहे अशा जिल्ह्यांना निर्णय घेण्याची मुभा शासस्तरावरून देण्यात यायला हवी होती. किंवा ग्रामीण भागात जर रुग्ण नसतील तर शाळा सुरू ठेवण्यास मुभा असायला हवी होती, काही जण तर जर सिनेमा गृह, मॉल, आणि इतर ठिकाणी जसे ५०% क्षमतेवर आस्थापना सुरू ठेवल्या आहेत तसे शाळेसाठी देखील मुभा असायला हवी, 50% विद्यार्थी बोलवून किंवा एकदिवस आड बोलावून शाळा देखील सुरू ठेवायला पाहिजे असा सूर पालक, शिक्षक वर्गातून येतांना दिसत आहे. याची कारणेही तशीच आहे की जेव्हा शाळा बंद होते तेंव्हा आपण जे इतर साधने शिक्षण सुरू ठेवण्यासाठी वापरतो ते एवढे परिणामकारक ठरले नाही. जे शैक्षणिक वातावरण व साधने शाळेत उपलब्ध आहेत ते घरी उपलब्ध नाही. विद्यार्थी-शिक्षक, शिक्षक-विद्यार्थी, विद्यार्थी - शैक्षणीक साधणे - शिक्षक, विद्यार्थी - विद्यार्थी या सर्व घटकांमध्ये ज्या आंतरक्रिया शाळेत घडून येतात त्या आंतरक्रिया शाळा बंद असल्यामुळे योग्य प्रकारे घडून येत नाही. याचा विपरीत परिणाम शिक्षण प्रक्रियेवर घडून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे टाळण्यासाठी शाळा बंद न होता सुरू रहाव्या असा एक सूर पालक शिक्षक वर्गातून निघतो आहे. ज्या प्रमाणे खेड्यातील शाळा कमी गर्दीच्या असल्यामुळें सुरू करण्यात आल्या होत्या त्या बंदही एव्हढ्या तडकाफडकी करायला नको होत्या, किंवा त्या सुरू ठेवाव्या की बंद कराव्या हा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर ग्रामसभा / शाळा व्यवस्थापन समिती यांना देण्यात यायला हवा होता असाही एक मतप्रवाह समोर येत आहे.
अर्थात हे सर्व कशासाठी तर विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत व योग्य पद्धतीने सुरू राहावे यासाठी.
परंतू शासनाची अडचण ही असावी की अजून ० ते १४ या वयोगटातील लसीकरण सुरू देखील झाले नाही, १५ते १८ वयोगट नुकताच सुरू झाला आहे. त्यामुळे मुलांसंदर्भात कोणतीही जोखीम शासनाला घ्यायची नसावी. त्याचबरोबर नवीन विषाणू मुळे होणारे परिणाम किती भयानक आहे हे अजुन समोर आले नाही ते भयानक आहे की सौम्य हे पडताळण्यासाठी शासन वेळ देखील पाहिजे असेल. अर्थात हा आपला अंदाज...
असो आपण अशी आशा ठेऊया किंवा प्रार्थना करुया की हे संकट लवकरच निघून जावो आणि आपल्या शाळा शिक्षण प्रक्रिया नियमीत सुरू होवो. अन्यथा जास्त वेळ शाळा बंद असण्याचे दूरगामी परिणाम या पिढीला भोगावे लागतील यात मात्र तिळमात्र शंका नाही. हे परिणाम टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे एव्हढेच पालक व शिक्षकांच्या हातात आहे..
जर आपण सर्वांनी मिळुन प्रयत्न केले आणि कोरोना ला पसरवण्यापासून थांबवण्यासाठी योग्य सुसंगत आचरण केले तर मात्र कोरोना हद्दपार होईल आणि नक्कीच आपण शाळा देखील लवकर सुरू करू शकतो..
आपले मत प्रतिक्रियेच्या स्वरूपात (comments) अवश्य नोंदवा...
धन्यवाद!
https://youtube.com/c/pradipjadhao
12 Comments
अयोग्य,ज्या गावात किमान खेड्यात जिथे रुग्ण सापडले तर हरकत नाही बंद करण्यास पण सरसकट बंद करणे अयोग्य.कारण हा रोग संपणार नाही आपल्याला अधिकची दक्षता बाळगत या सोबत जगणे शिकावयास हवे.
ReplyDelete100%सहमत🙏
Deleteऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना पाहिजे तसे कळतच नाही शिवाय नेट प्राॅब्लेम लाईट प्राॅब्लेम मुळे ही त्रास होतो. त्यामुळे सरसकट शाळा बंद करणे अयोग्यच.
ReplyDelete100%सहमत 🙏
Deleteशाळेत सर्व नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांना शिकविले जात असून सुद्धा शाळा बंद केल्या जात आहे तर बाकी ठिकाणी कोरोनाचे कुठलेही नियम पाळले जात नाही पण ते बिनदिक्कतपणे चालू आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात आहे.शिक्षण तज्ञाचे म्हणने पण हेच आहे. शाळा बंद करणे अयोग्यच!
ReplyDelete100% सहमत 🙏
Deleteशाळा बंद व्हायला नकोत या मताचा मी पण आहे,परंतु शाळा बंद करण्यामागचा सरकारचा उद्देश पण समजून घ्यावा असे वाटते,कारण त्यामुळे पगार वगैरे तर काही बंद नाही व कोणताही इतर आर्थिक फायदा गव्हर्मेंट चा होत नाहीय तरी पण शाळा बंद याचा उद्देश समजून घ्यावा,
ReplyDeleteYes 👍
Deleteसहमत 100%सहमत
ReplyDeleteThank you 🙏
Delete
Deleteआज खेड्यातील परिस्थिती बघता कोरोना आजाराची कोणतीही संभावना दिसत नाही मात्र शासनाने सरसकट शाळा बंद केल्या हा निर्णय 💯 %मला तरी चुकीचा वाटतो. मागील दोन वर्षांपासून सतत शाळा बंद असल्याने विद्यार्थी मागे पडले. आता कुठेतरी विद्यार्थी रोलींगवर आलेत आणि शाळा बंद झाल्या. हे चुकीचे झाले. मुंबई पेशंट वाढले म्हणून सरसकट शाळा बंद करणे योग्य नव्हे.
Agree 👍👍
Delete