संभाव्य शिक्षक आँनलाईन बदली प्रक्रिया.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या हा २०१७ पासून खूप चर्चेचा विषय ठरला आहे. या आगोदर शिक्षकांच्या बदल्या ह्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत होत्या, शाळा व तालुक्याची सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन ह्या बदल्या तालुका व जिल्हा स्तरावरून करण्यात येत असत. परंतू २०१७ पासून या प्रक्रियेत अमुलाग्र बदल घडून आला आहे. १५ मे २०१४ च्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असत आणि आजही शिक्षक हा संवर्ग वगळून इतर सर्व संवर्गाच्या बदल्या ह्याच शासन आदेशानुसार करण्यात येतात. मात्र शिक्षकांची संख्या इतर संवर्गापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शिक्षक बदली प्रक्रिया ही आँनलाईन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.
२७/०२/२०१७ ला त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करून १५ मे २०१४ च्या शासन आदेशातून शिक्षक संवर्ग वगळण्यात आला. २०१७ साली बनवलेल्या पोर्टल मधील तांत्रिक अडचणी मुळे बदली प्रक्रिया होऊ शकली नाही. परंतू २०१८ साली आँनलाईन बदली प्रक्रियेद्वारे शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्या एकाने दुसऱ्याला खो दिला दुसऱ्याने तिसऱ्याला जवळ असलेले पती पत्नी दूर गेले व दूर असलेले जवळ आले. तालुका समानिकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. अनेक शिक्षकांच्या मनात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. त्यांनी न्यायालयांचे दार ठोठावले तर काहींनी मिळाले ते गोड मानून घेतले. २०१९ मध्ये निवडणुका व काही अडचणींमुळे बदल्या होऊ शकल्या नाहीत. २०२० कोरोना च्या सावटाखाली निघून गेले. २०२१ साली नवीन शासनाने बदली प्रक्रिया तशीच ठेवावी की त्यात काही बदल करावे यासाठी समिती गठित करून तिचा अहवाल मागवला व त्यानुसार बदली प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. व २७/०२/२०१७ चा शासन निर्णय अधिक्रमित करून ०७ एप्रिल २०२१ रोजी शिक्षक बदली प्रक्रिया संदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर केला. २०२१ मध्ये या शासन आदेशानुसार बदली प्रक्रिया होणार होती परंतु ती काही कारणास्तव होऊ शकली नाही.
या वर्षीही काही शिक्षक बांधवांना बदली प्रक्रियेचे वेध लागले आहेत. या वर्षीची बदली प्रक्रिया ही ७ एप्रिल २०२१ च्या शासन आदेशानुसार होण्याची शक्यता आहे तो शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करावे..
वरील शासन निर्णय डाऊनलोड करा आणि जाणून घ्या यावर्षीची शिक्षक बदली प्रक्रिया कशी राबविली जाईल...?
जिल्हा सेवा गृहीत धरली जाईल की तालुका?
किमान किती वर्ष एका शाळेत सेवा केल्यावर बदली मिळू शकेल?
कोणकोणती संवर्ग बदली प्रक्रियेत असतील?
हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील शासन आदेश डाऊनलोड करावा...
ऑनलाइन बदल्या संदर्भातील सुधारित शासन व धोरण निश्चित करणारा 27/02/2017 चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
या व अशा अनेक महत्वाचे शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Google search करा pradipjadhao.
धन्यवाद!
0 Comments