मातृविद्यापीठ राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ!
स्वराज्याची संकल्पना, प्रेरणा, प्रथम उद्गात्या, स्वराज्य संकल्प प्रणेत्या, मातृविद्यापीठ, राजमाता, राष्ट्रमाता जिजामाता..!!
खऱ्या अर्थाने जर स्वराज्याच्या आद्य प्रवर्तक कुणी असेल तर त्या मासाहेब जिजाऊ होत., संपुर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पीडित शोषित जणांसाठी मातृ हृदय जर कोणाचे जागृत झाले असेल तर ते स्वराज्य जननी जिजामाता यांचे होते. ज्यांचे प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याची प्रेरणा आणि संकल्पना स्फुरली आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या म्हणजे राजमाता जिजाऊ होत. आपल्या लेकरासाठी मातृ हृदय तर प्रत्येक मातेचे असते परंतू दीन, दलीत परकीय सत्ता व आक्रमण यामुळे होरपळून गेलेल्या जनते साठी ज्यांचे मातृ हृदय हेलावून गेले आणि त्यांचेसाठी स्वराज्य निर्माण करण्याचे स्फुरण ज्यांनी आपल्या मुलाला शिवाजी महाराजांना ज्यांनी दिले, स्वराज्य निर्मिती साठी स्वतःच्या मुलाच्या प्राणांची जोखीम ज्यांनी पत्करली, स्वराज्य रक्षणासाठी स्वतःच्या नातवाच्या जीवाची जोखीम ज्यांनी पत्करली, स्वराज्याला दोन समर्थ छत्रपती ज्यांनी घडवले, त्या स्वराज्य माता म्हणजे जिजाऊ.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला मातृतीर्थ म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील लखुजी जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा येथे बुलडाणा जिल्हा येथे झाला. लखुजी जाधव यांचे मनातील दुःख जिजाऊ यांनी जाणले त्यावेळी मराठा सरदार एकमेकांशी भांडत कुणी मुघल सरदार म्हणून तर कुणी आदिलशाही सरदार म्हणून त्यांनी विचार केला परकियांच्या आश्रय आपापसात का भांडावे त्यापेक्षा आपले स्वतःचे राज्य का नाही? आपल्यापैकीच कुणी राजा का नाही? त्यांचे वडील लखुजी जाधव आणि लग्न झाल्यानंतर पती शहाजीराजे भोसले हे परकीय सत्तेची चाकरी करत होते आणि त्यांनी त्यांची घुसमट पहिली होती त्यामुळे त्यांना वाटायचे आपल्या मुलांबाबत असे व्हायला नको.
शिवाजी महाराजांना त्यांनी बालपणात त्यांनी या सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. परकीय सत्तेमुळे जनतेवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची जाणीव करून दिली. त्यांचे मनात स्वतंत्र स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग फुलविले. त्यांना स्वराज्याचे स्वप्न दाखविले आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना तयार देखील केले.
शिवरायांना कोणताही बाका प्रसंग आला तर तो संयमाने आणि चातुर्याने प्रसंगी पराक्रमाने कसा हाताळायचा याची शिकवण त्यांनी दिली. शिवाजी महाराज जेंव्हा मोहिमेवर असायचे तेंव्हा संपुर्ण स्वराज्याचा कारभार एकहाती सांभाळण्याची जबाबदारी त्या अत्यंत कुशलतेने बुद्धीचातूर्याने पार पाडत.
अशा ह्या थोर स्वराज्य मातेला मानाचा त्रिवार मुजरा!
धन्यवाद!
2 Comments
प्रेरणादायी लेखन. जन्म वर्ष बदलावे.
ReplyDeleteThank you 🙏
Delete