गांधी एक विचार..
व्यक्ती जन्म घेतात जगतात आणि कालांतराने त्यांचा मृत्यू होतो. परंतु विचार मात्र मरत नाहीत. महात्मा गांधी हे केवळ व्यक्ती नव्हते तो एक सर्वव्यापक असा विचार होता. म्हणून कितीही वेळा गांधी मारण्याचा प्रयत्न केला तरी तो असफलच होईल कारण गांधी हा विचार आहे व्यक्ती नाही....
महात्मा गांधी यांनी भारतीयच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला काही विचार दिले आणि ते विचार कोणते?
१) सत्याग्रह
२) स्वावलंबन
३) अहिंसा
४) स्वदेशी
हे त्यांच्या विचारांचे मुळ होते..
१)इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा.. तुम्हाला तुमचा ‘स्व’ सापडेल. त्यांनी स्वतः चे जीवन इतरांसाठी खर्ची घातले.
२)जग बदलायचं असेल आधी स्वत:ला बदला. त्यांनी स्वतः मध्ये बदल करून त्याप्रमाणे ते संपूर्ण जीवन जगले.
३)असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असे शिका की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात. महत्वाच्या गोष्टी आज करे सो अब या तत्वाने त्यांनी केल्या. ते जीवनभर शिकत राहिले.
४)पहिले ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर ते तुमच्याकडे पाहून हसतील.. आणि नंतर ते तुमच्याशी भांडतील तेव्हा तुम्ही जिंकाल. हाच मूलमंत्र त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी वापरला आणि यशस्वी करून दाखवला.
५)तुम्ही मला साखळदंडात बांधून ठेऊ शकता.. यातना देऊ शकता…एवढेच नाही तर माझे शरीर नष्ट करु शकता; पण तुम्ही माझे विचार कधीच बंदीस्त करुन ठेऊ शकत नाही.
६)विश्वास ठेवणे एक गूण आहे, अविश्वास दुर्बलतेची जननी आहे. त्यांनी सर्वप्रथम स्वतः वर विश्वास ठेवला आणि नंतर संपुर्ण देशाने त्यांच्यावर.
७)जेव्हा मी निराश होतो.. तेव्हा मी स्मरणात आणतो की, संपूर्ण इतिहासात सत्य आणि प्रेमाच्याच मार्गाचा विजय झाला आहे. त्याच मार्गाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा यशस्वी केला.
८)चांगल्या योजनेवर विश्वास ठेवणारा एक सूक्ष्म जीव संपूर्ण इतिहास बदलू शकतो. या तत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी भरतीत स्वातंत्र्य लढा सुवर्णअक्षरांनी लिहिला.
९)माझा धर्म सत्य आणि अंहिसेवर आधारीत आहे. सत्य माझा परमेश्वर आणि अंहिसा त्याला प्राप्त करण्याचे साधन. त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग कधीही सोडला नाही.
१०)केवळ प्रसन्नताच एकमेव अत्तर आहे, जे तुम्ही इतरांवर शिंपडल्यास त्यातील काही थेंब नक्कीच तुमच्यावर पडतील.
११)मानवतेवरील विश्वास गमावू नका. मानवता एखाद्या सागराप्रमाणे आहे. जर या सागराचे काही थेंब वाईट असले तरी संपूर्ण सागर वाईट असू शकत नाही. असा त्यांचा ठाम विचार होता.
१२)ज्या दिवशी एक महिला रात्री रस्त्यावर एकट्याने फिरू शकेल, त्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो.
१३)व्यक्ती हा आपल्या विचारांनी घडणारा प्राणी आहे, तो जो विचार करतो तसाच तो बनतो.
जीवनभर त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग कधीही सोडला नाही.
स्वतः च्या कपडासाठी वेळ मिळेल तेंव्हा सुतकताई केली. स्वतः ची कामे ते स्वतः करायचे.
भारताला स्वातंत्र्य मिळावे ते रक्ताचा एक थेंबही न सांडता ही त्यांची पक्की धारणा होती. आणि जगाच्या इतिहासात सर्वप्रथम त्यांनी ते यशस्वी देखील करून दाखवले.
अशा ह्या महान विचारास माझे विनम्र अभिवादन!!
धन्यवाद!
अशाच थोर पुरुषांच्या विचारांची ओळख करून घेण्यासाठी नियमीत भेट दया pradipjadhao.com ला..
व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या पुढील YouTube चॅनल ला..
6 Comments
अप्रतिम विचारांची प्रभावी अभिव्यक्ती..
ReplyDeleteThank you Respected sir🙏
Deleteउच्चतम् मानवी मूल्यांचा सार म्हणजे गांधी विचार. अखिल मानव कल्याणार्थ बापूंचे विचार आजही शाश्वत व प्रांसगिक आहे.
Deleteबापूंना विनम्र अभिवादन
Yes 🙏🙏
Deleteखूप खूप अप्रतिम लिखान !!!
ReplyDeleteThank you 🙏
Delete