शाळा बंद पण शिक्षण सुरू - विद्यार्थी शिक्षक पालक यांचेसाठी सूचना.. कोरोनाची तिसरी लाट प्रत्यक्ष शाळा बंद झाल्या तरी शिक्षण सुरू ठेवूया

 शाळा बंद पण शिक्षण सुरू 

कोरोनाची तिसरी लाट...

विद्यार्थी शिक्षक पालक यांचेसाठी सूचना.


 प्रत्यक्ष शाळा बंद झाल्या तरी शिक्षण सुरू ठेवूया..

नमस्कार सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण प्रेमी बंधू भगिनिंनो,

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या तिसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस वाढत आहे, महाराष्ट्रात देखील ही संख्या २० हजारांपेक्षा जास्त झाली आहे, १८ वर्षांवरील बहुतांश लोकांचे लसीकरण झाले आहे. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण सुरू झालं आहे. ही चांगली बाब आहे. परंतू अजूनही ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण सुरू झालं नाही त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात प्रत्यक्ष ऑफलाईन शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. या आगोदर आपण ही परिस्थिती हाताळली असल्यामुळे आपण बऱ्यापैकी तयार आहोत. परंतू तरीही त्या अनुभवामुळे काही समस्या देखील आपल्या समोर आल्या आहेत. त्या समस्यांना पालक शिक्षक व विद्यार्थी यांनी कसे हाताळावे याविषयी विचार करुया..


विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना.

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी छान अभ्यासाला सुरुवात केली आहे, यापुढेही असेच त्यांनी आपला अभ्यास सुरु ठेवायचा आहे. यासाठी जर घरी मोबाईल वरून शिक्षक ज्या सूचना देतील त्या पालकांच्या सहाय्याने समजून घेऊन त्यानुसार..

@शाळा फक्त ऑफलाईन बंद झाल्या पण आँनलाईन सुरूच असणार आहे.

@ आँनलाईन क्लास घेणे आणि प्रत्यक्ष शिकवणे यामध्ये थोडा फरक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी थोड जबाबदारी ओळखून वागावं लागेल.

@वेळेवर आँनलाईन क्लास जॉईन करावा.

@ऑनलाईन क्लास करतांना शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

@दिलेला अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करून तो शिक्षकांना whatsapp वर पाठवा आणि तपासून घ्या.

@जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन नाही तर आपल्या मित्रासोबत जर आपण क्लास जॉईन करू असला तर करावा.

@साधा मोबाईल असेल तर शिक्षकांना फोन करून अभ्यास विचारावा समजून घ्यावा व तो पूर्ण करावा.

@शक्य असल्यास अभ्यास करतांना गूगल, दिक्षा, Youtube, यासारख्या विविध मोबाईल शैक्षणिक application चा वापर कसा करावा हे शिक्षकांकडून समजून घ्यावा त्याचा वापर शक्यतो पालकांच्या उपस्थितीत करावा.

@शक्य असेल तर आपल्या मित्राला/मैत्रिणी सोबत अभ्यास करावा जे आपल्याला समजलं ते त्यांचेसोबत चर्चा करा जे नाही समजलं ते आपल्या मित्रांशी चर्चा करून समजून घ्या.


पालकांसाठी महत्वाच्या सूचना.

@उपलब्ध असेल तरच विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासासाठी तुमच्या निरक्षणा खाली शिक्षकांनी सांगितलेल्या वेळेवरच द्यावा.

@उपलब्ध नसेल तर सध्या मोबाईल वरुन देखील तुम्ही शिक्षकांना फोन करून अभ्यास विचारून तो आपल्या पाल्याला देऊन त्यांचेकडून करून घेऊ शकता. शाळा नेहमीसाठी बंद झाल्या नाही शक्य तेवढे आपली मुलांकडून करून घ्यावे.

@मुलांना खूप जास्त वेळ मोबाईल देऊ नये दिला तर विद्यार्थी अभ्यासच करतोय याची खात्री करावी. विद्यार्थी अभ्यास करतांना जर शक्य असेल तर घरातील कोणीतरी मोठा समजदार व्यक्ती त्याचे जवळ बसावे.

@न रागावता शांततेत जेव्हढा शक्य आहे तेवढा अभ्यास मुलांकडून करून घ्यावा.

@काही शंका असल्यास शिक्षकांना फोन/मेसेज करून शंकानिरसन करून घ्यावे.

@आपली मुले शिक्षकांच्या प्रत्यक्ष समोर नसल्यामुळे त्यांचेकडून शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून घेणे गरजेचे आहे.

@विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास शिक्षकांना पाठवून तपासून घेतला की नाही याची दररोज खात्री करून घ्यावी.

@वेळोवेळी शिक्षकांच्या संपर्कात राहावे...


शिक्षकांसाठी महत्वाच्या सूचना.

@विद्यार्थी व पालक यांना सम्पर्क करून शाळा प्रत्यक्ष बंद असल्या तरी देखील आँनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे याची कल्पना त्यांना द्यावी.

@आँनलाईन क्लास केंव्हा व किती वेळ राहील याचे नियोजन पालक व विद्यार्थी यांना सांगावे.

@whatsapp वरुन रोजच्या सूचना दिल्या जात असतील तर नियमीत मेसेज तपासण्याच्या सुचना द्याव्या.

@शाळा ही नेहमीसाठी बंद झाली नसून काही दिवस ही परिस्थिती राहणार आहे त्यामुळे असल्यास मोबाईल विद्यार्थ्यांना मोठ्या समजदार व्यक्तीच्या निरीक्षणाखाली मोबाईल ऊपलब्ध करून द्यावा अशी सूचना द्यावी.

@काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क करण्याचा योग्य वेळ पालकांना सांगावा म्हणजे त्यांचेसाठी व आपल्यासाठी देखील सोयीचे होईल.

@आँनलाईन क्लास मध्ये दिलेला अभ्यास हा परत whatsapp गृपवर टाकावा व तो केंव्हा पर्यंत करून पाठवायचा आहे याच्या स्पष्ट सूचना द्याव्या.

@आलेला अभ्यास तपासून किती वेळात आपण देऊ शकतो याची कल्पना विद्यार्थी व पालकांना द्यावी.

@क्लासचे रेकॉर्डिंग करता आले तर ते छानच म्हणजे एकच एक घटक वारंवार शिकवावं लागणार नाही. काही अडचण आल्यास विद्यार्थी पालक तो व्हिडिओ परत पाहू शकतील.

@शक्य असल्यास ऑफलाईन भेटीत किंवा फोनवर विद्यार्थी पालकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करूया.


धन्यवाद!

आपलाच...

प्रदिप जाधव

pradipjadhao.com


https://youtube.com/c/pradipjadhao






Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.