बदलती मानसिकता शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी..
(भाग दोन)
भाग एक मधे आपण समाज आणि पालक यांची मानसिकता याविषयी विचार मांडला....
शिक्षण प्रक्रिया ज्याचेसाठी चाललेली असते असा जो तो विद्यार्थी या महत्वाच्या आणि शिक्षण व्यवस्थेच्या महत्वाच्या घटकाची मानसिकता आणि या मानसिकतेचा शिक्षण व्यवस्थेवर कसा परीणाम होत आहे.. याविषयी विचार करुया..
"विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता परीक्षार्थी बनला आहे." हे जवळ जवळ १००% सत्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण 'शिक्षण म्हणजे त्या त्या विषयाची परीक्षा देऊन पास होणे म्हणजे शिक्षण' ही शिक्षणाची व्याख्या रूढ होते की अशी भीती कधी कधी वाटायला लागते. कारण सर्व काही एखादी परिक्षा पास होण्यासाठी चाललेले असते जणू काही ती परीक्षा म्हणजेच जीवन आहे जणू.
शिक्षण कसे आणि का घ्यावे? शिक्षण घेण्याचा उद्देश काय आहे हे समजुन न घेता फक्त परीक्षेत एनकेन प्रकारे जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन गुण मिळवणे. ते मिळवण्यासाठी मग क्लासेस लावणे, नुसतेच न समजता पाठांतर करणे यासह अनेक गैरप्रकारांचे बळी पडणे हे प्रकार चालू होतात. परीक्षेत पास होण्यासाठी जास्त गुण मिळवण्यासाठी मग शॉर्टकट शोधले जातात.
विद्यार्थ्यांची शाळा व शिक्षकांकडून अपेक्षा!
विद्यार्थी व पालक शाळेला एखादी पक्का माल तयार करणारी फॅक्टरी समजतात की ज्यात एका बाजूने कच्चा माल टाकून त्यावर प्रक्रिया करून दुसऱ्या बाजूने पक्का माल बाजारात विकण्यासाठी तयार होतो. त्यांना शाळेकडून व शिक्षकांकडून त्याची हमी देखील हवी असते की या शाळेत जर विद्यार्थ्याची addmission केली तर तो तिथून बाहेर पडल्यावर डॉक्टर, इंजिनिअर होऊनच बाहेर पडेल.
शिक्षण ही एकतर्फी प्रक्रिया नसून ती जेवढी शाळा व शिक्षक यांचेवर अवलंबून आहे तेवढीच विद्यार्थी व पालक यांचेवर देखील अवलंबून आहे हे समजून घेण्याची मानसिकता मात्र खूप कमी लोकांची दिसून येते. शिक्षण ही एक आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्रत्येक घटक हा तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रक्रिया ज्या घटकावर होते तो घटक हा निर्जीव वस्तू नसून तो एक सम्पूर्ण इतरांपेक्षा वेगळी एकमेव अद्वितीय व्यक्ती आहे. जी तिच्या स्वतंत्र गतीने वेगवेगळ्या गोष्टी ग्रहण करते व समजून घेऊन त्याचा उपयोग वेगळ्या परिस्थितीत देखील करू शकते.
पालक आपला पाल्य शिक्षक व शाळा यांचेवर शिक्षणासाठी सर्वस्वी जबाबदारी ढकलून मोकळा होतो. विद्यार्थी शॉर्टकट शोधून सम्पूर्ण मेहनत न घेता आपल्याला सर्व रेडिमेड तयार करून आपणास घास भरवतील ही अपेक्षा बाळगून शाळेत येतो. तर शाळा व शिक्षक त्यांना जमेल त्या पद्धतीने शक्य तसे विद्यार्थ्याला बऱ्याचशा गोष्टी समजून न घेता फक्त पाठ्यपुस्तकातील दिलेला पाठ्यक्रम कसाबसा शिकवून मोकळे होतात व राहिलेली जबाबदारी विद्यार्थी व पालक यांचेवर सोपवून मोकळे होतात. म्हणजे स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून प्रत्येक घटक दुसऱ्या घटकांकडून अपेक्षा बाळगून राहतो. आणि अशा मानसिकतेत 'शाळा नावच्या फॅक्टरी मध्ये विद्यार्थी नावचा कच्चा माल फॅक्टरी मालक (संस्थाचालक) यांचे ब्रँड कडे पाहून त्या फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या (शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी) भरवशावर अतीशय परपक्व अशा पक्क्या मालाची (गुणवत्तापूर्ण शिक्षण) ची अपेक्षा करतात फी नावाच्या मोबदल्या च्या स्वरूपात.'
परंतू जर शिक्षण प्रक्रियेत अतीशय उत्तम फलीताची अपेक्षा असेल तर विद्यार्थी, शिक्षण, शाळा, शिक्षक व शिक्षण व्यवस्था यांनी परस्परांवर जबाबदार न ढकलता स्वतःची जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे जाणीपूर्वक वागून विद्यार्थ्याच्या अपेक्षित वर्तन बदलाकडे लक्ष केंद्रीत करून आवश्यक ते ते सर्व प्रयत्न केले तर आपल्याला अभिप्रेत सर्व काही आपण करू शकतो, फक्त गरज आहे ती परस्पर सहकार्य आणि समन्वय राखण्याची.. परस्परांवर विश्वास ठेवण्याची आणि परस्परांच्या विश्वासास पात्र होण्याची. असे घडल्यास पालकांना अपेक्षित शाळा आणि शिक्षक तयार होतील आणि शाळा आणि शिक्षक यांना अपेक्षित विद्यार्थी आणि पालक, अखेरीस या सर्वांची अपेक्षा पूर्ण करणारा अभ्यासक्रम देखील..
https://youtube.com/c/pradipjadhao
लेख आवडला तर प्रतिक्रिया नोंदवण्यास विसरू नका!!
धन्यवाद!
2 Comments
छान
ReplyDeleteThank you 🙏
Delete