चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Parts of Sentence - Verb क्रियापद

 चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Parts of Sentence - Verb - क्रियापद

क्रियापद हा वाक्यातील अतीशय महत्वाचा भाग आहे. वाक्याचा अर्थ हा क्रियापदावर अवलंबून असतो. 

वाक्यात इतर भाग असतील किंवा नसतील परंतू क्रियापद हे असतेच क्रियापदा शिवाय वाक्य तयार होऊच शकत नाही.

फक्त क्रियापदाचे देखील अर्थपूर्ण वाक्य होउ शकते परंतू क्रियापदा शिवाय वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही.

वाक्यातील क्रियादर्षक शब्द म्हणजे क्रियापद होय हे आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये शिकलो आहे.

वाक्यात क्रीया कोणत्या काळात घडली ती पूर्ण झाली, अपूर्ण आहे की नेहमीच घडते हे स्पष्ट करण्यासाठी क्रियापदला सहाय्यकारी क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागते.

यानुसार क्रियापदाचे दोन भाग पडतात 

१) मुख्य क्रियापद - Main Verb

२) सहाय्यकारी क्रियापद - Helping Verb

वाक्यात गरज पडल्यास मुख्य क्रियापदाच्या सहाय्याला सहाय्यकारी क्रियापद आलेले असते. अशा वाक्यात मुख्य व सहाय्यकारी क्रियापद हे दोन्ही मिळून वाक्यातील क्रियापदाचे काम करतात.

उदा.

The farmers work to grow the vegetable in the farm.

वरील वाक्यात फक्त मुख्य क्रियापद आलेले आहे तरी देखील वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.

परंतु

The farmers are selling their vegetable in the market.

वरील वाक्यात To sell या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी are या सहाय्यकारी क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागले आहे.

मराठी भाषेतील वाक्य आणि इंग्रजी भाषेतील वाक्य यांच्या रचनेतील मूळ फरक म्हणजे.

मराठी भाषेतील वाक्यात क्रियापद हे सर्वात शेवटी आलेले असते तर इंग्रजी भाषेतील वाक्यात क्रियापद हे कर्त्या नंतर लगेच लागून आलेले असते.

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.