Part of speech - शब्दांच्या जाती
इंग्रजीत एकूण आठ शब्दांच्या जाती आहेत त्या पुढील प्रमाणे.
1) Noun - नाम
2) Pronoun - सर्वनाम
3) Verb - क्रियापद
4) Adverb - क्रियाविशेषण
5) Adjective - विशेषण
6) Preposition - शब्दयोगी अव्यय
7) Conjection - उभयान्वयी अव्यय
8) Interjection - केवलप्रयोगी अव्यय
या वरील सर्व शब्दांच्या जातींचा परिचय आपण टप्प्या टप्प्या ने रोज एक एक करून घेऊया आज आपण नाम (noun) या शब्दांच्या जातीतील पाहिल्या गोष्टीचा परिचय करुन घेऊया..
1) Noun (नाम)
एखाद्या व्यक्ती, स्थळ, वस्तू, किंवा कल्पनेच्या नावाला नाम असे म्हणतात. उदा. कपिल, मुंबई, घर, आनंद ई.
Name of a person, place, thing, or idea is called Noun. Eg. Kapil, Mumbai, home, joy etc.
बऱ्याच वेळा इंग्रजीमध्ये नामा आगोदर उपपद a/an/the हे वापरलेले असते. (प्रत्येक वेळी असतेच असे नाही)
Nouns are often used with the articles the, a, an but not always.
नामांचे दोन प्रकार समूह किंवा वैयक्तिक पातळीवरुन पडतात एखाद्या समुहास जेव्हा नाव दिलीले असते त्यालाच आपण सामान्य नाम असे म्हणतो. तर एखाद्या विशिष्ट गोष्टीला आपण जेव्हा वैयक्तीक नाव देतो तेव्हा त्याला विशिष्ट नाम असे म्हणतो इंग्रजीत विशिष्ट नाम हे नेहमी कॅपिटल लेटर नेच सुरू होते. परंतु सामान्य नाम हे नेहमी कॅपिटल लेटर नेच सुरू होते नाही.
Proper nouns always start with a capital letter but common nouns do not starts with capital letters.
For example. Ramesh, Radha, Mumbai, India
mango, people, tree etc.
जी नावे मोजता येतात त्यांचे दोन प्रकार पडतात I)एकवचनी आणि ii)अनेकवचनी तर त्या गोष्टीच्या भौतिक अस्तित्वावरुन देखील दोन प्रकार आहेत मूर्त नाम आणि अमूर्त नाम डोळ्याने दिसणारे मूर्त आणि डोळ्याने न दिसणारे अमूर्त.
Nouns can be singular or plural, concrete or abstract.
ढोबळ मानाने पाहता नाम म्हणजे नाव असे आपण म्हणू शकतो.
नाम या शब्दाच्या जाती बद्दल अधिक माहितीसाठी या पोस्ट वर कॉमेंट करून नक्की सांगा...
10 Comments
Thank you sir!
ReplyDeleteEasy method for learning
ReplyDeleteThank you 🙏
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteAryan
ReplyDeleteYes...?
DeleteThanks sir
ReplyDeleteWelcome
DeleteEk Paul English kade
ReplyDelete