चला शिकुया इंग्रजी भाषा - सुरवात

 चला आपणही इंग्रजीला आपलंसं करुया!!

मी जेव्हा शाळेत होते म्हणजेच शाळेत शिकत होतो त्यावेळी वेगवेगळ्या भाषांबद्दल माझ्या मनात खूप कुतहल होत. घरी सर्व मराठी बोलायचे गावात/वर्गात काही मुस्लिम मित्र होते ते हिंदी भाषेत बोलत. शेतात जो मजूर वर्ग यायचा तो मराठीतच बोलायचा परंतू त्यांची मराठी थोडी वेगळी वाटायची काही नवीन मराठीतील शब्द त्यांच्याकडून ऐकायला मिळत.

शाळेत असताना ५ व्या वर्गात एक नवीन भाषा इंग्रजी या विषयाची/भाषेची ओळख झाली. ५वी पासुन हिंदी भाषा देखील सुरू झाली परंतू ती बऱ्याच वेळा ऐकलेली आणि हिंदी भाषेची लिपी देवनागरी असल्यामुळे मराठी येत असल्याने ती भाषा शिकायला आणि समजण्यास एवढी अवघड गेली नाही.

इंग्रजी चा मात्र वेगळा विषय होता. ही भाषा एवढी परिचित नव्हती त्यातल्या त्यात इंग्रजीची लिपी देखील वेगळी. मग सुरवात एबीसीडी पासून झाली. घरी आई बाबा हे जास्त शिकलेले नसल्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेविषयी खूप अप्रूप वाटायचं तशी इंग्रजी भाषेची तोंडओळख त्यांना होती मात्र त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं की इंग्रजी भाषा ज्याला येते तो खूप शिकलेला आणि हुशार असतो. आणि इंग्रजी भाषा ही शिकण्यासाठी खूप अवघड असते. मग माझ्या मनात शंका आपल्याला इंग्रजी भाषा जमेल का? आपल्याला इंग्रजी भाषा वाचता लिहिता बोलता येईल का? काही ओळखीच्या लोकांची मुले सेमी इंग्रजी/इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात हे देखील ऐकलेले होते. मग आपण तर मराठी माध्यमात शिकतो आपलं कसं? ह्या सगळ्या गोष्टींचा गुंता माझ्या डोक्यात देखील होता. हा सगळा गुंता डोक्यात ठेवून इंग्रजी शिकायला सुरवात झाली. आणि जेमतेम इंग्रजी ९ व्यां वर्गापर्यंत वाचता लिहता येऊ लागली. मात्र बोलणे मात्र काही फारसे जमत नव्हते.

परंतू आता १० वी चं वर्ष आणि इंग्रजी जरा टेन्शनच परंतु शिक्षकांनी छान मेहनत करुण घेतली व त्याचं फळ म्हणून दहावीत इंग्रजी विषयात distinction मिळाले त्यानतंर मागे वळून पाहिले नाही १२ वीत देखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो विशेष भर म्हणजे इंग्रजी ग्रामर ची जी भीती होती ती अगदी दूर पाळली एवढी की त्याचे आधारावर D Ed ला देखील इंग्रजीत खूप छान गुण मिळाले. त्यानतंर प्रथम श्रेणीत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. कुठेही अडचण आली नाही.

इंग्रजी भाषेची अनेक प्रशिक्षणे नोकरी लागल्यावर पूर्ण केली काही आँनलाईन कोर्स देखील पूर्ण केले. आता बोलताही छान येते त्यामुळे इंग्रजी विषयाच्या काही आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये देखील सहभागी होता आले. राज्यस्तरावरील सेमिनार मध्ये इंग्रजीतून सादरीकरणही केले. आणि आता विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग यशस्वी करत आहे. 

कोणतीही भाषा शिकण्यासाठी काहीच अवघड नाही जर तुम्हाला एक भाषा चांगली येत असेल तर आणि अपल्याला प्रत्येकाला आपली मातृभाषा ही नक्कीच चांगली येते मग इंग्रजीच काय आपण जगातील कोणतीही अवघडात अवघड भाषा शिकू शकतो.

जग हे बदलले आहे फक्त माझ्या वर्गात बसनारेच माझे विद्यार्थी न राहता इतरांनाही इंग्रजी भाषा शिकण्यासाठी या ब्लॉग वर नियमीत काहीतरी लिहिणार आहे या ब्लॉगच्या माध्यमातून शिकवणार आहे आणि तुमच्याकडून शिकणार देखील आहे..


इंग्रजी विषयाच्या कोणत्या भागापासून सुरवात करायची हे कॉमेंट करून नक्की सांगा!!


धन्यवाद!!


Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.