डॉ बाबासाहेब आंबेडकर.
शिक्षण हे मानवी जीवनात किती बदल घडवून आणू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फक्त ज्ञानाच्या भरवशावर स्वतःचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याची ताकद असते हे दाखवून देणारी पहिली विभूती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
एक रक्ताचा थेंब देखील न सांडता समाजातील वंचित घटकांना इतरांप्रमाणे सारखे हक्क व अधिकार मिळवून लाखो लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारे थोर बुद्धिवादी क्रांतिकारक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होय.
आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले त्यापैकी काही महापुरुषांनी शस्त्र हाती घेऊन क्रांती घडवून आणली, काहींनी सत्याग्रह आंदोलने या माध्यमातुन क्रांती घडवून आणली, तर काही महापुरुषांनी स्वतः तसे वागून स्वतः आदर्श बनुन समाजात क्रांती घडवून आणली, परंतू डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे क्रांतिकारक आहेत ज्यांनी शिकून आपल्या बुद्धीच्या व लेखणीच्या जोरावर भारतीय समाजात अमुलाग्र क्रांती घडवून आणली.
स्वतः वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं परंतू समाजातील प्रत्येक मुलाला वर्गात बसून शिक्षण घेण्याचा अधिकार मिळवून दिला.
देशाचे पहिले कायदामंत्री, कामगार मंत्री म्हणून त्यांनी मोठी कामगिरी पार पडली. देशाची राज्यघटना बनवणाऱ्या समिती मध्ये ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
जसे ते कायदेपंडित होते तसेच ते एक समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथांचे लेखक, तत्ववेक्ता असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आहे.
अशा या महापुरुषांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी तर महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ साली झाले. जर आपणास त्यांना अभिवादन करायचे असेल तर त्यांचे विचार समजून घेऊन आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून त्यावर योग्य कृती केल्यास ते खरे त्यांना आपले अभिवादन असेल.
अशा ह्या थोर बुद्धिवादी, क्रांतिकारक कायदेतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ तत्वावेक्ता, लेखक अशा खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमतत्वास विनम्र अभिवादन!
🙏🙏🙏🙏🙏
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
2 Comments
विनम्र अभिवादन
ReplyDelete🙏🙏🙏🙏🙏
Delete