राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन करणेबाबत- शासन निर्णय

  आजचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय

🔰राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच  स्थापन करणेबाबत.

शासन निर्णय डाऊलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा..

Download


राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन करणेचा हेतू.👇

१. शिक्षकांचे मूल्यांकन करून त्यांचे सक्षमीकरणासाठी त्यांना गरजानुरूप

प्रशिक्षण देणे.

२. राज्यासाठी अनुदेशन व्यवस्थापन प्रणाली (Teacher Learning Management System) विकसित करणे.

३. इ. १० वी, १२ वी परीक्षा ऑनलाईन करून त्यांचे मूल्यांकन करणे.

४. शिक्षण विभागातील सर्व घटकांना केंद्र व राज्य शासन स्तरावरील शैक्षणिक तंत्रज्ञान सेवांबद्दल जनजागृती करणे. उदा. दीक्षा, स्वयं, सरल प्रणाली.

५.सर्व घटकांना शैक्षणिक समस्यांचे कुशलतेने व्यवस्थापन, निराकरण आणि परिणामकारक संवाद साधण्यासाठी कार्यप्रवण करणे.

६. समाज जीवनात होणाऱ्या नवनवीन घडामोडींबद्दल अद्ययावत ज्ञान माहिती देणारे कार्यक्रम / सेवा पुरविणे.

७. विविध ऑनलाईन पोर्टलचा परिणामकारक वापरास चालना देणे.

८. शिक्षण विभागातील सर्व घटक / भागधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शक स्रोत तयार करणे.

९. वर्ग स्तरापासून ते राज्य स्तरीय कार्यालयांना माहिती तंत्रज्ञान सेवांशी जोडणे. 

१०. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कालसुसंगत बदलांचे अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर एक प्रभावी मंच तयार करणे. 

११. शिक्षण प्रणालीस सुस्थिती देण्याची खात्री करणे.

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.