मुल्यवर्धन/मूल्यशिक्षण आणि अभ्यासक्रम

 नमस्कार मित्रहो,

     विषय नेहमीचाच पण वेगळा. आपण, लोक, पालक, मीडिया ई. बऱ्याच वेळा या विषयाची चर्चा करतो परंतु प्रत्यक्ष कृतीत आपण या विषयाला आणू शकलो नाही. कारण एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून माझ्या वागण्यात आणि बोलण्यात बऱ्याच वेळा तफावत दिसून येते. आणि म्हणूनच आपण आपल्या विद्यार्थ्यांत, आपल्या पाल्यात मूल्य शिक्षण रुजवण्यात कुठेतरी कमी पडतोय असे म्हणावे लागेल.

   आपल्या महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकात इयत्ता आठवी च्या इंग्रजी विषयात एक अगदी सर्वांचे डोळे उघडावे अशी एक (mason) बांधकाम करणाऱ्या गवंड्याची कथा आहे. 

कथा अशी आहे की,

     एक बांधकाम करणारा गवंडी असतो. तो एका बांधकाम ठेकेदाराकडे काम करत असतो. तो अतिशय प्रामाणिकपणे उत्तम दर्जाचे काम करणारा म्हणून परिसरात त्याची ख्याती असते. अभियंता किंवा स्थापत्य अभियंता यांनी दिलेले घराचा आराखडा जसाचा तसा हुबेहूब साकारण्याची कला त्याच्या अंगी असते. जसा घराचा आराखडा त्याला बांधकाम कंत्रादारांकडून त्याला मिळे तसे त्याचे काम सुरू होत असे आणि तो अतिशय मन लाऊन उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य वापरून, अतिशय अचूक मापे घेऊन त्याच्याकडे असलेली सर्व कौशल्ये वापरून मजबूत आणि आकर्षक असे घर बांधायचा. त्यामूळे त्याच्या कामावर घरमालक अपेक्षेपेक्षा अधिक चांगले काम केले म्हणून खुश व्हायचा. या गवंड्यामुळे कंत्राटदाराचा व्यवसाय देखील खुप छान चालत होता. कंत्राटदार त्याला त्याच्या कामाचा मोबदला देखील अगदी योग्य देत होता ज्यामुळे  त्या मोबदल्यावर त्या गवंड्याच घर अगदी खाऊन पिऊन सुखी होतं. अशा पद्धतीने गवंडी अनेक वर्ष अगदी प्रामाणिकपणे आणि इमानेइतबारे काम करत राहिला. आणि जेव्हा त्याला नातवंड झाली त्याने ठरवलं की आता आपण या कामातून निवृत्ती घ्यावी व नातवांसोबत खेळण्यात त्यांना संभाळण्यासाठी आपले पुढील आयुष्य व्यतीत करावं. दृढ निश्र्चयी व्यक्ती असल्यामुळे तो त्याचा निर्णय त्याच्या बांधकाम कंत्राटदाराला कळवतो, कंत्राटदाराने विनवण्या करूनही तो त्याचा निर्णय बदलत नाही. कंत्रादार शेवटी एक विशेष विनंती म्हणून त्याला एक शेवटचे घर बांधायचा आग्रह करतो आणि तो नाराजीनेच मान्य करतो.

    एका चांगल्या ठिकाणी अतिशय सुंदररित्या तयार केलेला घराचा आराखडा गवंड्याला नेहमीप्रमाणे जसा मिळत होता तसा गवंड्याला देण्यात येतो. गवंडी आपल्या आयुष्यातील शेवटचं घर बांधायला सुरुवात करतो पण त्याचं मन मात्र या कामात लागत नाही तो कसतरी करायचं म्हणून काम करतो. बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे मिळाले तरी ते वापरतो आणि अतिशय निष्काळजीपणे आणि घाईत त्या घराचं काम पुर्ण करतो. घराचे काम एवढे निकृष्ट दर्जाचं असतं की ते आराखड्या प्रमानेही दिसतही नाही, तरीही घराचं काम पुर्ण झालं असं कंत्राटदाराला कळवतो व पुर्ण झालेल्या घराच्या चाव्या घेण्यास बोलवतो. कंत्राटदार एक कायदेशीर कागदपत्राची फाईल घेऊन तिथं येतो. जेंव्हा गवंडी चाव्या कंत्राटदाराकडे देतो तेव्हा चेहऱ्यावर अत्यंत मोठं हसू आणत त्याच्याकडे असलेली फाईल व चाव्या गवंड्याच्या हाती देऊन म्हणतो "मी हे आगोदरच ठरवलं होत की हे घर तुला (गवंड्याला) द्यायचं आता तू ह्या घराचा कायदेशीर मालक आहेस." कथा इथे संपते.

   वरील कथेवर विचार करायला गेल्यास आपल्या लक्षात असे येते की आयुष्यभर ज्या बांधकाम कारागिराने अर्थात गवंड्याने अतिशय उच्च प्रतीचे काम केले अगदी प्रामाणिक पणे काम केले मात्र फक्त एकदाच त्याने त्याच्या कर्तव्यात कसूर केली आणि त्याचा परिणाम म्हणून निकृष्ट दर्जाचे घर त्याच्या वाट्याला आले. मग मी विचार करायला हवा की मी किती वेळा माझ्या कर्तव्यात कसूर करतो! आणि का बरं आपल्याला आयुष्यात निराशा पदरी पडते? याचं कारण मला शोधायची गरजच पडणार नाही.


धन्यवाद!!🙏


Post a Comment

26 Comments

  1. Best story and nice moral story

    ReplyDelete
  2. जस पेरलं तस उगवतं आंब्याचे झाड नाही लावलं तर आंबे कुठून मिळणार?

    ReplyDelete
  3. जे जे पेरलं ते उगवणार

    ReplyDelete
  4. खूप छान... मार्मिक 👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  5. Truly meaningful.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.