ज्ञानार्जनासाठी मातृभाषेचे महत्त्व.

ज्ञानार्जनासाठी मातृभाषेचे महत्त्व...
       मातृभाषा ही शिक्षणाचे माध्यम असावे असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. अर्थातच ज्ञानार्जनासाठी मातृभाषा ही खूप महत्त्वाची ठरते.
       शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना हा अनुभव अनेकदा येतो. मातृभाषे व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत सांगितलेली गोष्ट एवढ्या लवकर लक्षात येते नाही ती मातृभाषेतून अगदी चटकन लक्षात येते. जरी मला इंग्रजी/हिंदी खूप चांगली येत असली तरी या भाषांतून सांगितलेली गोष्ट एवढ्या लवकर लक्षात येणार नाही. पण तीच गोष्ट मला जर मराठीतून सांगितली तर खूप चांगली व लवकर समजते हा माझा स्वतःचा अनुभव आहे.आणि जर शिक्षणाचा मूळ उद्देश ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, रसास्वाद, नवनिर्मिती व जीवनाचा आनंद घेणे असेल तर या प्रत्येक पायरीवर सहज रित्या आपणास व विद्यार्थ्यास पुढे न्यायचे असेल तर प्रत्येकाच्या वैयक्तिक पातळीवर जाऊन विचार केल्यास आपल्या लक्षात येते की मातृभाषाच आपल्याला या सर्व पातळ्यांवर सहज नेऊ शकते. कारण प्रत्येकाची विचारप्रक्रिया ही त्याच्या मातृभाषेतून चालते.
       जेव्हा १ ल्या वर्गाच्या विद्यार्थ्याला "इकडे ये" असे म्हणतो त्यावेळी तो मला कुठलीही प्रतिक्रिया देत नाही पण जेव्हा मी त्याला "ई वा" असे त्याच्या मातृभाषेतून सांगतो तो लगेच माझ्याजवळ येतो. हा अनुभव मला अनेक वेळा आला आहे. जर मी त्याला "आंबा" दाखवला तर ५ वी तील मुलाला त्याला मराठीत आंबा म्हणतात हे माहीत असूनही त्याच्या तोंडातून आगोदर "मामडी" हा त्याच्या कोलामी ह्या मातृभाषेतूनच येतो हे मला येथे आवर्जून नमूद करावे वाटते.

https://youtu.be/EoFTyCgrcMk

         वरील सर्व गोष्टी नमूद करण्याचा उद्देश एवढाच की ज्ञानार्जनासाठी व शिक्षणाच्या त्यापुढील पायऱ्या पादाक्रांत करण्यासाठी मातृभाषा हे एक खूप मोठे साधन आहे.
          एक महत्वाची बाब यावरून लक्षात येते की मातृभाषेचा साधन म्हणून वापर करून आपण इतर कोणतीही भाषा आपण शिकू व शिकवू शकतो. ही बाब बोलीभाषिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्या व देण्यासाठी खूप महत्वाची आहे.



क्रमशः

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.