जागतिकीकरणात बहुभाषिकत्वाचे स्थान
आज जग जवळ आलं आहे आणि जगात अनेक भाषा बोलल्या जातात, ज्या व्यक्तीला अनेक भाषा जाणतो तो व्यक्ती जगातील अधिकात अधिक ज्ञान प्राप्त करून ते इतरांनी देऊ शकतो. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ज्या देशात त्या कंपनीची शाखा आहे तेथील स्थानिक भाषा अवगत करावी लागते, तेच सरकारी नोकरी साठी पण लागू पडते जेथे कोठे (राज्यात/देशात) नोकरी करायची आहे तेथील स्थानिक भाषा त्या अधिकारी/कर्मचाऱ्याला अवगत करावी लागते.
वेगवेगळ्या भाषा आत्मसात करणे त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हे काम शालेय जीवनापसूनच झाले तर किती महत्वाची बाब त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वृद्धिंगत झालेली आपणास दिसून येईल.
[(आम्ही करत असलेल्या बहुभाषिक अध्ययन अध्यापन कार्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.. https://youtu.be/EoFTyCgrcMk )]
एक करीयर म्हणून देखील बहुभाषिकत्वाकडे आपण पाहू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणी दुभाषी, भाषांतरकार, टुरिस्ट गाईड या व अशा अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या भाषा आत्मसात करण्याची कौशल्य जर बालपणापासूनच विद्यार्थी मनावर सहज रित्या बिंबावल्या गेले तर शिक्षण अधिक जीवणाभिमुख होण्यास मदत होईल असे मला वाटते.
बहुभाषिकत्वामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळा पैलू जोडला जातो आणि त्यामुळे एका बहुआयामी व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत होते ही बाबाही विद्यार्थी व शिक्षकाच्या दृष्टिकनातून येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. यासाठीदेखील एक शिक्षक म्हणून बहुभाषिक अध्ययन अध्यापन याविषयी विचार करणे आवश्यक आहे.
क्रमशः....
2 Comments
Nice project
ReplyDeleteThank you!
Delete