एकाच भाषेच्या वेगवेगळ्या बोली भाषा..

         
         भारतात नुसत्या अनेक भाषा आहेत असे नाही तर एका भाषेच्या अनेक बोलीभाषा देखील आहेत, आणि प्रत्येक बोलीभाषा आपला स्वतंत्र असा लहजा व शब्दकोश यासह समृध्द आहे.
         उदाहरणच द्यायचं झालं तर मराठी कोकणात वेगळी, विदर्भात वेगळी तर मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीने बोलली जाते.            मराठवाड्यातील 'उभा ठाक' हा शब्दप्रयोग कोकण व विदर्भातील व्यक्तीला समजेलच असे नाही. मराठवाड्यातील एका वर्गमित्राने हा शब्द डी एड प्रथम वर्षामध्ये सूक्ष्म पाठ घेतांना हा शब्दप्रयोग केला व तो आम्हाला समाजाला नाही आम्ही सर्व त्याच्याकडे पाहत राहिलो तो परत परत तो शब्दप्रयोग करू लागला परंतु तो आम्हाला कळायला मार्ग नव्हता त्याचे म्हणणे होते ' उभा रहा' !!


जर वयाच्या १९ व्या वर्षी आम्हाला मराठीतला एक वेगळा शब्द समजत नव्हता तर....
      वेगळी भाषा असलेल्या १ल्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्याला एका एकदम वेगळ्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करत असताना त्या विद्यार्थ्याला किती समजेल व तो कसा शाळेत शिकता होईल याची कल्पना आपण करू शकतो.
       यासाठी बहुभाषिक अध्ययन अध्यापन याविषयी जाणून घेणे शिक्षक म्हणून मला महत्वाचे वाटते.

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.