अभ्यासक्रमाचे त्रिभाषा सूत्र.

    'बहुभाषिक अध्ययन व अध्यापन' व अभ्यासक्रमाचे त्रिभाषा सूत्र याचाही खूप जवळचा संबंध आहे.
    आपल्या आभ्यासक्रम आराखडयानुसार पहिली भाषा जी विद्यार्थ्याची मातृभाषा/शिकण्याचं माध्यम असलेली भाषा असते तसेच १ते ४ या वर्गासाठी इंग्रजी ही दुसरी भाषा म्हणून शिकवण्यात येते व ५व्या वर्गापासून हिंदी किंवा अजून उपलब्ध असलेल्या भाषांपैकी एक भाषा १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निवडावी लागते.
    जरी या तीन भाषांपैकी १ली भाषा विद्यार्थ्याची मातृभाषा असते अस आपण मानलं तरी त्या विद्यार्थ्याला मातृभाषे व्यतिरिक्त दोन भाषांचा अभ्यास करायचा आहे. आणि भाषा शिकणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे व त्यातून तो विद्यार्थी जात असतो यावेळी त्याला गरज भासते ती योग्य मार्गदर्शनाची आणि त्याचा जवळचा मार्गदर्शक म्हणजे शिक्षक.
    पण जर विद्यार्थ्यासाठी १ली भाषा ही त्याची मातृभाषा नसेल तर परिस्थिती अधिक बिकट तयार होते. मातृभाषा व १ली भाषा एक असताना जो सहसंबंध शाळेतला वर्ग व घर यामध्ये सहजासहजी तयार होतो तो इथं तयार होत नाही. विद्यार्थ्याला शाळा आपलीशी वाटत नाही. त्यासाठी बहुभाषिक अध्ययन अध्यापन याविषयी प्रत्येक शिक्षकाचा योग्य दृष्टिकोन तयार होणे गरजेचे आहे.
   एकूणच वेगवेगळ्या भाषा एकमेकांना अडसर न ठरता परस्पर पूरक कश्या ठरतील याविषयी विचार करणे गरजेचे आहे.
     उदा. मराठी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्याला इंग्रजी भाषा शिकायला अवघड जाते कारण त्या दोन्ही भाषांमध्ये कोणताच सारखेपणा आढळून येत नाही. तेच मराठी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्याला हिंदी भाषा शिकण्यास सोपी जाते कारण या दोन्ही भाषांमध्ये खूप साम्य आढळते ते म्हणजे दोन्हींची लिपी एकच देवनागरी आहे. उच्छारामध्येही साम्य आढळते.
    वरील प्रमाणे तुलनात्मक अभ्यास करून शिक्षकाने विद्यार्थ्याला वेगवेगळ्या भाषा आत्मसात करण्यास मदत करणे गरजेचे आहे.

https://youtu.be/EoFTyCgrcMk

क्रमशः

Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.