my Article published in Shikshan Samiksha Magazine 'matrubhasha aani shikshan'

मातृभाषा आणि शिक्षण

   शिक्षणाचं माध्यम कोणते? हा प्रश्न विचारला तर त्याच त्याचं निश्चित अस उत्तर आहे की ते त्या विद्यार्थ्यांची मातृभाषा असावे. हे मत फक्त माझे नाही तर जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञ व शिक्षणावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचं देखील मत आहे. तरीही पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकण्याचा अट्टाहास कशासाठी करतात हे एक रहस्यच आहे.
  सर्वसामान्य परिस्थितीत महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते आणि महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु सर्वसामान्य पालक मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकण्यास तयार नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकण्याचा अट्टाहास पालक करतात. परंतु इंग्रजी मध्यामाच्या शाळांमध्ये किती प्रमाणात इंग्रजी माध्यमातुंच शिकवले जाते? शक्यतोवर इंग्रजी शाळेतही बऱ्यापैकी शिक्षक मराठी किंवा हिंदी भाषेचा वापर अपरिहार्यता म्हणून करतो जर त्यांचा वापर नाही केला तर किती मुलांना शिकवलेले कळेल हे सांगू शकत नाही. कारण पालक म्हणून आम्ही इंग्रजी माध्यमात मुलांना टाकण्यासाठी तयार नाही कारण आपण घरात इंग्रजी वापरत नाही(अपवाद वगल्यास) किंबहुना पालकालच इंग्रजी आवश्यक त्या प्रमाणात येत नाही नाव ना घेता सांगायचे झाल्यास चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून तब्बल ५ मुले मराठी माध्यमाच्या ४थ्या वर्गात शाळेत आले. म्हणजे नर्सरी केजी १,२ व वर्ग १,२,३. अशी ६ वर्ष ही मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली आता त्यांना धड मराठीही वाचता येत नाही व इंग्रजीचे तर सांगूच नका. हे असे का झाले त्यात दोष त्या शाळेचा किंवा शिक्षकाचा आहे असे मी मुळीच म्हणणार नाही दोष आहे तो निवडलेली माध्यमाचा. जास्त बुद्धी असलेली १०% मुले ही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टिकू शकतात तेही सुरवातीला त्यांना जड जाते.
हे झाले सर्वसामान्य मराठी कुटुंबासाठी... आता त्या कुटुंबातील मुलांचे काय ज्यांची भाषा मराठी नाही. (उदा. आदिवासी कुटुंब) महाराष्ट्रात मराठी व्यतिरिक्त इतर काही बोलीभाषा बोलणाऱ्या जमाती देखील आहेत त्या संख्येने कमी असल्यामुळे त्यांच्यासाठी शासन त्यांच्या भाषा माध्यम असणाऱ्या शाळा काढू शकत नाही व पुस्तकेही त्यांच्या भाषेत नसतात. त्यामुळे अशा मुलांच्या मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध नाही ही त्यांची अस्सह्याता आहे. यावेळी अनेक प्रश्न उपस्थित होतात. व मग या विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे पुढे जाणार??यातील १०% विद्यार्थी जे चांगल्या बुद्धिमत्तेचे आहे तेच १० वी १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकतात. हे टाळण्यासाठी ९०%विद्यार्थ्यांची गळती टाळण्यासाठी शिक्षण क्षेत्रात व्यापक प्रमाणात प्रयोग व दृशिकोनातील बदल अपेक्षित आहे. महाराष्ट्रात बोलीभाषेतून शिक्षणाचे काही प्रयोग समोर आले आहे ते व्यापक प्रमाणात शिक्षक बांधवांनी समजून घेण्याची गरज आहे.
     बोलीभाषा बोलणाऱ्या जमाती मध्येही ज्या बोलीभाषा मराठी/हिंदी भाषेशी संबंधित नसणाऱ्या गटात मोडतात त्यांच्या समस्या अधिक गंभीर आहेत. एकतर ह्या जमाती इतर समाजात सहजा सहजी मिसळत नाही. व मिसळणा-या असल्याही तरी त्या निदान त्यांच्या घरात तरी त्यांची बोली वापरतात. त्यामुळे जेव्हा या कुटुंबातील मुल मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये येते तेव्हा त्याला मुख्य अडचण येते ती भाषेचे जर शाळेतील शिक्षकांची भाषाच कळत नाही तर शाळेत ही मुले रमतील तरी कशी त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासून शाळेविषयी अनास्था निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अशा बोलीभाषा बोलणाऱ्या जमाती मुले ज्या शाळेत शिकतात अशा शाळेत उपलब्ध असल्यास त्यांच्या बोलीभाषेची जाण असलेल्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी व या बोलीभाषा विषयी या मुलांविषयी  आदर असणारी एक फळीच शिक्षकाची तयार होणे गरजेचे आहे. शाळा स्तरावर तरी या बोलीभाषेतील साहित्य तयार होणे गरजेचे आहे. की ज्यामुळे ही मुले लिहायला वाचायला शिकतील व त्यांच्या शिक्षणाची गाडी पुढे जाण्यास नक्कीच मदत होईल.

प्रदिप गणपतराव जाधव
सहाय्यक शिक्षक,
जि. प. शाळा गावपोड शिवणी,
ता. घाटंजी, जि. यवतमाळ.
मो.न. 9765486735
ईमेल: jadhaopg@gmail.com

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.